अहमदनगर

किलबिलाट झाला दुर्मिळ; वाढत्या तापमानाच्या परिणामामुळे पक्षांच्या संख्येत घट

अमृता चौगुले

बाळासाहेब वराट

साकत : पुढारी वृत्तसेवा

निसर्गाच्या कुशीत अंगणात झाडावर पहाटेच्या पक्षांचा किलबिलाट ऐकवायला येत होता; गेल्या काही वर्षांपासून हा किलबिलाट दुर्मिळ झाल असून, थवेच्या थवे नामशेष होत चालले आहेत. त्यामुळे आकाशात जणू उदास बेरंगच झाले. मानव निर्मित नवनवीन शोध लागल्याने जगाची प्रगती खरी झाली; परिणामी अवघ जग माणसाच्या मुठीत आलं. बोटाच्या इशार्‍यावर नाचू लागलं. हे होत असताना निसर्गाची प्रचंड हानी झाली.

पर्यावरणातील सातत्याने होणारे बदल नैसर्गिक अनियमितता सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करतात. निसर्गाच्या बदलत्या चक्राचा परिणाम सर्वच क्षेत्रावर होताना दिसून येतो. शेतकर्‍यांना शेती उत्पन्नात घट, उष्णतेची लाट यासह अनेक अडचणी वाढल्या. यामुळे पक्ष्यांच्या विणीच्या काळ बाधित झाला आहे. त्यामुळे संखेतही झपाट्याने कमी झाली आहे. दिवसेंदिवस वाढत चालले सिमेंटचे जंगल, उद्योग, कारखानेश तर दुसरीकडे होणारी वृक्षतोड, पर्यावरणाचा र्‍हास यांमुळे हजारो पक्ष्यांची घरेटे ध्वस्त झाले आहेत.

अशा अनेक कारणांनी पक्षी गतप्राण होताना दिसत आहेत. पक्षाच्या मृत्यूमुळे पिकांवर रोगराई वाढली, ग्रामीण परिसरात शिवारात नांगरणी पाळी -पेरणी, पाणी देताना बगळे, चिमनी, असे पक्षी जमिनीतील आळ्या, कीटके भक्ष्य बनवून टाकत. यामुळे बर्‍याच प्रमाणात कीडनियंत्रन होते. पर्यायी पिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.

उष्णता, प्रदुषणा वाढीमुळे संखेत घट

जागतिक तापमान वाढ, बेसुमार वृक्षतोड, नॉयलान मांजा, इमारतीवर बसलेल्या मोठ्या काचा, लग्नसमारंभ, वाढदिवस, उद्घाटनातील प्रदूषण, मोबाईल नेटवर्क, लहरींचे कंपण, दूषित पाणी, रासायनिक खतांचा बेसुमार वापर, तननाशकासह फळे व पालेभाज्यांवरील वाढत्या फवारण्या, होणार्‍या शिकारी या कारणांमुळे पक्षी कमी होत आहेत.

किडे, मुंग्यांवर उपजीविका करणार्‍या पक्षात घट

किडे, मुंग्या खाऊन उपजीविका करणारे प्रमुख पक्षांपैकी घार, कावळा, कोकिळा, खंड्या, सातभाई, घुबड, बदक, करकोचा, माळडोकमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसते.

बदलत्या मानवी जीवनशैलीमुळे तापमानात वाढीमुळे अंडी उगमन व प्रजनन क्षमतेवर परिणाम झाल्याने पक्षात घट झाली आहे. दाट लोकवस्ती, वृक्षतोड, कारखानदारीमुळे लाखो पक्षांचे घरे उध्वस्त झाले आहेत. आपणास भविष्यात नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करायचे असेल, तर दार तेथे बाग, वनसंवर्धन करावे नाहीतर भविष्य अंधकारमय असेल.

             – डॉ. सुनील नरके, प्राचार्या जामखेड महाविद्याल, पर्यावरण अभ्यासक

बदलते हवामान, नैसर्गिक आपत्ती, मानवी हस्तक्षेप पक्षाचे स्थानिक अधिवास नष्ट झाल्याने तेथील खाद्य, पाण्याचे स्तोत्र कमी झाल्याने पशु- पक्षी, प्राण्यांमध्ये घट झाली.

                                        -डॉ. महेश मासाळ, पशुधन मित्र

हेही वाचा

SCROLL FOR NEXT