liger film  
Latest

Liger : विजय देवरकोंडाने भर कार्यक्रमात अनन्याला केलं किस (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रणवीर सिंह स्टार आहे. केवळ बॉलीवूडच नाही तर साऊथ सेलेब्स देखील त्याला खूप आवडतात आणि यामुळेच मुंबईत नुकत्याच झालेल्या लीगरच्या ट्रेलर रिलीज कार्यक्रमात रणवीरला खास गेस्ट म्हणून बोलावण्यात आले होते. यावेळी भर कार्यक्रमात साऊथ स्टार विजय देवरकोंडाने सर्वांसमोर अनन्या पांडेचे चुंबन घेतले. (Liger) हे पाहून रणवीर सिंह स्टेज सोडून निघून गेला. (Liger) लायगर चित्रपटाच्या टीमसाठी गुरुवारचा दिवस खूप खास होता. या चित्रपटाचा ट्रेलर मोठ्या थाटात प्रदर्शित करण्यात आला. याचा ट्रेलर फक्त एक नव्हे तर हैदराबाद आणि मुंबई या दोन शहरांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. सकाळी हैदराबादमध्ये आणि संध्याकाळी मुंबईत ट्रेलर रिलीज करण्यात आला.

मुंबईत झालेला हा कार्यक्रम खूपच प्रेक्षणीय होता. कारण त्यात रणवीर सिंहने उपस्थिती लावली होती. जिथे रणवीर असतो तिथे तिथे मस्ती आणि धमाल असते. तथापि, इव्हेंटचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लायगर म्हणजेच विजय देवरकोंडा अनन्या पांडेसोबत असे काही करतो की ज्यामुळे रणवीरला वाईट वाटते आणि तो स्टेज सोडतो.

अनन्या, रणवीर आणि विजय देवरकोंडा हे तिन्ही स्टार्स स्टेजवर चित्रपटाच्या गाण्यावर डान्स करत असतात. रणवीर पहिल्यांदा विजयसोबत डान्स स्टेप करतो. मग अनन्या पण येते आणि विजय अनन्याला किस करतो तेव्हा तिघेही नाचू लागतात.

हे पाहून रणवीर विजयला थम्स अप करतो आणि मस्ती करत स्टेज सोडतो. त्याचवेळी अनन्या त्याला थांबवण्यासाठी त्याच्या मागे येते आणि त्याला दुसऱ्या गालावर किस करायला सांगते. हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे.

या चित्रपटात विजय बॉक्सरची भूमिका साकारते आहे. अनन्या या चित्रपटात त्याच्या प्रेमाची भूमिका साकारत आहे. विजय, अनन्या व्यतिरिक्त या चित्रपटात रम्या कृष्णन मुख्य भूमिकेत आहे तसेच माईक टायसनचाही चित्रपटात कॅमिओ आहे. ट्रेलरचे खूप कौतुक होत आहे. एवढेच नाही तर ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंडला सुरुवात झाली.

या चित्रपटाद्वारे विजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. २५ ऑगस्ट रोजी हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT