पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा उद्या

पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा उद्या
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 23 जुलै रोजी राष्ट्रीय व राज्य स्तरावर पुणे ते बारामती सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे मानद सचिव अ‍ॅड. संदीप कदम आणि उपसचिव एल. एम. पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्पर्धेचे हे सलग सातवे वर्ष आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होणार असून त्यामध्ये पुणे ते बारामती पुरुषांसाठी (120 कि.मी.), पुणे ते बारामती पुरुषांसाठी (120 कि.मी), सासवड ते बारामती पुरुषांसाठी (85 कि.मी), माळेगाव ते बारामती ही 18 वर्षांवरील वयोगटील मुलींसाठी (15 किमी), माळेगाव ते बारामती ही 16 वर्षांखालील मुलींसाठी व 17 ते 18 वर्षे वयोगट (15 किमी) आणि माळेगाव ते बारामती 16 वर्षांखालील मुलांसाठीव 17 ते 18 वर्षे वयोगट (15 किमी.) अशा सहा गटामध्ये होणार आहे.

या स्पर्धेत कर्नाटक, आंध्र प्रदेश, सेनादल, चंदीगड, दक्षिण-मध्य रेल्वे, उत्तर-पूर्व रेल्वे, एअरफोर्स, तामिळनाडू, गुजरात, मध्य रेल्वे, नवी दिल्ली बरोबर महाराष्ट्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 400 ते 450 सायकलपटूंचा सहभाग असणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, दि. 23 जुलै रोजी सकाळी 8 वाजता शनिवारवाडा येथे होणार असून, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, एआयएसएसएम सोसायटीचे मानद सचिव मालोजीराजे छत्रपती यांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण दु. 2 वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून, यावेळी आमदार अमोल मिटकरी, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, सुनेत्रा पवार यांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शनिवारवाडा ते हडपसर न्यूट्रल झोन
सायकल रॅलीसाठी शनिवारवाडा येथून उत्तरेकडे सूर्या हॉस्पिटल चौक – उजवीकडे वळून कुंभारवाडा चौक – डावीकडे वळून डेंगळे पूलावरून राष्ट्रवादी भवन – डावीकडे वळून पुणे महानगरपालिका – जुना बसस्टॉप समोरून – बालगंधर्व – झाशीची राणी पुतळ्यापासून डावीकडे- जंगली महाराज रोडवरून डेक्कन मार्गे पुढे लकडी पुलावरून अलका टॉकीज चौक- टिळक रोड- स्वारगेट- सेव्हन लव्हज चौक- गोळीबार मैदान- रेसकोर्स मैदान- भैरोबा नाला मार्गे हडपसरला पोहोचेल.

मुख्य राष्ट्रीय स्पर्धा हडपसर येथून
मुख्य सायकल स्पर्धा हडपसर ते बारामती या मार्गावर होणार असून, ही स्पर्धा हडपसरपासून सकाळी 9.30 वा सुरू होऊन वडकी नाला- दिवे घाट- सासवड- जेजुरी- वाल्हे- निरा- सोमेश्वरनगर- वडगाव निंबाळकर- कोर्‍हाळे- पणदरे- माळेगाव या मार्गे जाऊन बारामती येथे समाप्त होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news