Latest

लता मंगेशकरांनी भावंडासह बाबांच्या पहिल्या श्राध्दाला घेतल्या होत्या ४ शपथ ! काय आहे तो किस्सा ?

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या जादूई आवाजाने सर्वांच्या मनावर राज्य  करणार्‍या  गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं.  

लतादीदींच्या जडण-घडणीत त्यांचे बाबा पं दीनानाथ यांचा खूप मोठा वाटा होता. पं दीनानाथ व शेवंता यांना इंदौर येथे २८ सप्टेंबर १९२९ रोजी एक कन्यारत्न झाले. त्याचं या लतादीदी. लतादीदींना आशा, मीना, उषा, ह्रदयनाथ ही चार भावंडे. पं दीनानाथ एका नाटकातील लतिका पात्राला प्रभावित होवून ते हेमाला लता म्हणू लागले. वडील पं दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि नाट्यकलावंत होते. लतादीदींना गायनाचे बाळकडू घरातूनच मिळाले. लताकडून ते तासनतास गायनाचा रियाज करून घेत.

पं दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर १३ वर्षीय लता नोकरी करू लागल्या. घरावर हलाखीची परिस्थिती आलेली. आपल्या मुलांनी आपल्या  वडिलांसारख बनावं म्हणून माई म्हणजे लतादीदींच्या आई पं. दीनानाथ यांची नाटक वाचून दाखवी. त्यांच्या जीवनातील पैलू समजावून सांगत.

पं दीनानाथ मंगेशकर यांच पहिलं श्राध्द होतं. मीना आणि आशा यांनी सर्व प्रकारचं भोजन बनवलं होतं. २१ प्रकारच्या भाज्या बनवल्या होत्या. पण माईंना ते रूचंल नाही. त्यावेळी त्यांनी घरातील पं दीनानाथ यांच्या आवडीचं एक चांदीच ताट विकलं. पण लता माईंना संतापान म्हणाल्या "तु बाबांच आवडीचं ताट का विकलसं?, तेव्हा माई म्हणाल्या, "हे माझ्या मालकांचं श्राद्ध आहे. कोणा सोम्यागोम्याचे नाही. ज्या वैभवात, थाटामाटात ते राहिले त्याच थाटामाटात त्याच श्राद्ध व्हायला हवं". चांदीच्या एका ताटासाठी काय अश्रू गाळतेस? तू मालकांसारखी गात राहिलीस तर चांदीच्या काय सोन्याच्या नाण्यांचा तुझ्यावर वर्षाव होईल."

संगीताशिवाय आम्ही दुसरं काहीही करणार नाही

श्राध्दाच्या वेळी पिंडदान करण्याची वेळ आली, कितीतरी वेळ कावळ्याची प्रतीक्षा करीत बसलो! पण कावळा आला नाही. तासाभरानंतर माई म्हणाली, तुम्हा पाच भावंडापैकी कोणीतरी काहीतरी चूक केली आहे म्हणून कावळा काही पिंडाला शिवत नाही आहे. तुम्ही पाचजण मिळून काहीतरी प्रतिज्ञा करा म्हणजे कावळा पिंडाला शिवेल. " पहिली प्रतिज्ञा रोज संगीताचा रियाज करू, नेमानं बाबाच श्राद्ध करू अशी दुसरी प्रतिज्ञा केली, तुमच्या श्राद्धदिनी दरवर्षी आम्ही संगीताचा कार्यक्रम सादर करू; अशी तिसरी प्रतिज्ञा घेतली तरी कावळा आला नाही.  "संगीताशिवाय आम्ही दुसरं काहीही करणार नाही अशी चौथी प्रतिज्ञा घेतली आणि कावळ्याने पिंडाला कावळा शिवला.

हेही वाचलत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT