प्रयागराज; पुढारी ऑनलाईन : लग्नाचं खोट वचन देऊन सेक्स : अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३ ऑगस्टला एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. लग्नाचे आमिष दाखवून झालेल्या बलात्कारांच्या गुन्ह्यासाठी स्वतंत्र कायदा असला पाहिजे, असं मत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रदीपकुमार श्रीवास्तव यांनी व्यक्त केलं आहे.
एकूण सामाजिक स्थिती लक्षात घेता, अशा प्रकारच्या कायद्याची गरज असल्याचे दिसून येतं. कानपूरमधील हर्षवर्धन यादव नावाचा एका आरोपी सध्या अटकेत आहे. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याने उच्च न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता.
हर्षवर्धन यादवचा एक महिलेशी विवाह निश्चित झाला होता. दोघेही कोर्टात लग्न करणार होते. त्यासाठी कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी यादवने महिलेला एका हॉटेलमध्ये बोलवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. घटनेच्या १७ तासांनंतर महिलेने पोलिसांत तक्रार दिली. आरोपीला अटक झाली, पण त्यानंतर आरोपीने जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज उच्च न्यायालयाने फेटळाताना खालील मुद्दे विचारात घेतलेले आहेत.
१. समाजी मानसिकत पुरुषप्रधान आणि सरंजामी आहे. महिलांचा वापर मनोरंजनासाठी करण्याची जी मनोवृत्ती दिसून येते याचा चोख बंदोबस्त केल्याशिवाय महिलांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होणार नाही.
२. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करताना मुळातच हेतू फसवणुकीचा असल्याचे अनेक प्रकरणात दिसून आलेलं आहे. अशा प्रकारात आपण कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही आणि शिक्षा होणार नाही, असं संबंधितांना वाटत असतं.
३. लग्नाचं वचनं हे आपल्या समाजातील अनेक महिलांसाठी मोठी गोष्ट असते. त्यामुळे त्या अशा पुरुषांच्या कचाट्यात सापडतात आणि त्यांचं शोषण होतं.
४. स्वतंत्र कायदा अस्तित्वात येईपर्यंत न्यायालयाने सामाजिक स्थिती लक्षात घेऊन अशा महिलांच्या रक्षणाची भूमिका घ्यावी.
५. या गुन्ह्यात पीडित महिलेचं आरोपी पुरुषावर प्रेम होतं. पण लग्नात कौटुंबिक अडथळे होते असं आरोपीचं मत आहे. त्यामुळे लग्नाच्या कागदपत्रांच्या तयारीसाठी या महिलेने हॉटेलवर जाणं काही चुकीचं नाही. पण आरोपीला या महिलेशी लग्न करण्याची कधीच इच्छा नव्हती. स्वतःची वासना पूर्ण करण्यासाठी या पुरुषाने पीडितेचा वापर केला. हा प्रकार शरीरसंबंधासाठी संमती मिळावी यासाठी केलेली फसवणूक यात मोडणारा आहे.
६. लग्नाचं आमिष हे महिलांची सेक्ससाठी संमती मिळवण्यासाठी वारण्यात आलेला मानसिक दबाव असतो.
७. त्यामुळे लग्नाचं खोट वचन देऊन शरीरसंबंधासाठी महिलेची संमती मिळवणं हा बलात्कारच आहे. न्यायालय अशा घटनांत प्रेक्षाकाची भूमिका घेऊ शकत नाही.
हे ही वाचलं का?
https://youtu.be/0C9F33TFAhc