

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिका अफगाणिस्तानमधून बाजूला झाली अन् लगेचच तालिबाननं (Taliban) त्याच्या वर्चस्व स्थापित केलं. यामध्ये झालं काय, तर गझनी, कंदहार, चराग-ए-शरीफ यांच्यासारखी मोठी शहरं तालिबान्यांकडे सहज गेली. तालिबान्यांची (Taliban) जी ताकद निर्माण झाली आहे, ती वाढली कुठून? कुठून आला इतका पैसा? हत्यारं खरेदी करण्यासाठी पैसा दिला कुणी? हे सगळे प्रश्न आजच्या घडामोडीवर उपस्थित झाले आहेत. काही आंतरराष्ट्रीय उत्पन्नांनुसार तालिबान्यांचं उत्पन्न १ अब्ज डाॅलरपेक्षाही जास्त होती. २०११ मध्ये ३०० मिलियन डाॅलर इतकं उत्पन्न झालं. हा आकडा वाढत-वाढत आता १.५ बिलियन डाॅलरवर गेला आहे.