काबूल; पुढारी ऑनलाईन : Afghanistan crisis Live : अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन लष्कर आणि नाटो फौजांनी एका रात्रीत काढता पाय घेतल्यानंतर हाहाकार उडाला आहे. रक्तपिपासू तालिबान्यांनी महिनाभरात देश काबीज करताना पुन्हा एकदा तालिबानी राजवटीची हाक दिली आहे.
देशातील प्रत्येक जीव संकंटात असताना राष्ट्राध्यक्ष अश्रफ गणी यांनी देश सोडल्याने संतापाची लाट उसळली आहे. तालिबान्यांनी काबूलवर निर्णायक आघाडी घेतल्यानंतर युद्ध समाप्तीची घोषणा केली आहे.
तालिबानी दहशतवाद्यांनी काबूलमधील रस्त्यांवर पॅट्रोलिंग केले. यावेळीच हजारो भयभित अफगाण नागरिकांनी देश सोडण्यासाठी शहरातील विमानतळावर गर्दी केली आहे. विमानतळावर झालेल्या अभूतपूर्व गर्दीमध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची देश सोडण्यासाठी पळापळ सुरु असतानाच अनेक देशांनी आपापले राजनैतिक अधिकाऱ्यांना सुखरुप सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
यासाठी काही स्थानिक नागरिकांची तसेच अफगाण स्टाफकडून मदत घेतली जात आहे.
तालिबानी राजकीय कार्यालयाचा प्रवक्ता असलेल्या मोहम्मद नईमने तालिबान अफगाणमध्ये स्वतंत्र राहणार नसून लवकरच सरकार स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आज परिस्थितीवर चर्चा करणार आहे.
हे ही वाचलं का?
https://youtu.be/FV7kx9vOS0o