इंदौर, पुढारी ऑनलाईन: लग्न ठरलेय पण अजून झालेले नाही. तरीही फिरणे होते, एकत्र येतो, मने जुळली की शारीरिक सबंधही घडून येतात. मात्र लग्नाची गोष्ट पक्की नसेल तर मुलींनी शारिरीक संबंध ठेवू नयेत.
सहमतीने संबंध ठेवले तर पुढची जबाबदारीही घ्यायला हवी, असे मध्य प्रदेशच्या इंदौर उच्च न्यायालयाने तरुणाला सुनावले.
भारत अद्यापही एक रुढी आणि परंपरा जपणारा देश आहे.
देशात सभ्यतेच्या मर्यादा असल्यानेच लग्नाअगोदर मुलगा आणि मुलींमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होण्यास येथे मान्यता नाही, अशी टिपण्णीही कोर्टाने केली आहे.
मध्य प्रदेशात तरुण आणि तरुणीचे लग्न ठरल्यानंतर शारीरिक संबंध निर्माण झाले. त्यानंतर लग्न झाले नाही.
त्यामुळे बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी करताना, न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर यांच्या खंडपीठाने महत्त्वाच्या बाबी नमूद केल्या.
भारत अद्यापही रुढी, परंपरा जपणारा देश आहे, त्यामुळेच सभ्यतेच्या मर्यादा येथे ओलांडल्या नाहीत, जेथे लग्नाअगोदर केवळ वचन आणि आश्वासनांवर मुलगा व मुलींमध्ये शारीरिक संबंध ठेवले जातील.
जर एखाद्या मुलाने एखाद्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले, तर पुढील जबाबदाऱ्यांचा सामना करण्याची तयारी त्याने ठेवायला हवी, असेही कोर्ट म्हणाले.
एका महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पीडितेने तरुणावर बलात्काराचा आरोप लावला होता.
लग्नाचे आमिष दाखवून युवकाने बलात्कार केला. त्यावेळी, दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते.
तसेच मुलगा मुस्लिम असल्याने मुलीच्या आई-वडिलांनीच या लग्नाला विरोध केला होता, असे आरोपीच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.
मुलीच्या वकिलांने बाजू मांडताना सांगितले, आरोपीने २०१८ पासून लग्नाचे आमिष दाखवून पीडितावर सातत्याने बलात्कार केला.
त्यानंतर त्याने लग्नासही नकार दिला. संबधित युवकाचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरले होते. ही बाब समजताच पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
या युक्तिवादानंतर न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
हेही वाचा: