Latest

राणेंचं विधान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान : जयंत पाटील

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राणेंचं विधान म्हणजे केवळ मुख्यमंत्र्यांचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. जयंत पाटील हे माध्यमांशी बोलत होते.

पाटील म्हणाले, नारायण राणे यांनी केलेलं व्यक्तव्य निषेधार्ह आहे. अशी भाषा राजकारणात कुणीही वापरली नाही. राजकारणाचा नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेलाय. शिवसेनेने संयम आणि जबाबदीरने वागण्याचं काम केलंय. शिवसैनिकांकडून ॲक्शनला रिॲक्शन येतेय. राणेंच विधान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, असेही ते म्‍हणाले.

काय म्हणाले होते राणे… 

'किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे, हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला, किती चीड येणारी गोष्ट आहे.' अशी टीका राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती.

राणे यांच्यावर केवळ राजकीय सुडापोटी कारवाई : चंद्रकांत पाटील

राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय मंत्र्याला अटक होऊ शकत नाही.

प्रत्येकाची एक स्टाइल असते. राणेंचीदेखील बोलण्याची एक स्टाइल आहे. त्यात द्वेष नाही. पण केवळ राजकीय सुडापोटी राणेंवर कारवाई केली जात असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

'अटक करायला मी काही सामान्य माणूस नाही'

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर चिपळून येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

अटक करायला मी काही सामान्य माणूस नाही, मी केंद्रीय मंत्री आहे. मी जे बोललो ते गुन्हा नाहीच.

आदेश कुठलाही काढू देत तो काही राष्ट्रपती आहे का? असा सवाल राणे यांनी केला आहे.

हेही वाचलं का ? 

SCROLL FOR NEXT