Latest

राज्यातील जीएसटी संकलनात ३१ टक्क्यांची वाढ

backup backup

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील जीएसटी संकलनात ३१ टक्क्यांची वाढ : देशात ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा (जीएसटी) करापोटी एकूण १ लाख १२ हजार २० कोटी रूपयांचा महसूल संकलित करण्यात आला.

विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा ऑगस्ट २०२१ मध्ये महाराष्ट्राचा जीएसटी महसुल ३१ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. ऑगस्ट २०२० मध्ये महाराष्ट्राचे जीएसटी संकलन ११ हजार ६०२ कोटी रूपये होते. तर, गेल्या महिन्यात राज्यात १५ हजार १७५ कोटी रूपयांचे जीएसटी संकलन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील जीएसटी संकलनात ३१ टक्क्यांची वाढ

महाराष्ट्र खालोखाल गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या जीएसटी संकलनात देखील वाढ दिसून आली आहे. गेल्या महिन्यात गुजरात ७,७७६, कर्नाटक ७,४२९ आणि तामिळनाडू ७,०६० कोटींचे जीएसटी महसूल संकलित करण्यात आला.

देशातील एकूण जीएसटी संकलनात केंद्रीय वस्तू आणि सेवाकर (सीजीएसटी) २० हजार ५२२ कोटी,आयजीएसटी ५६ हजार २४७ कोटी आणि अधिभार ८ हजार ६४६ कोटी रूपयांचा समावेश आहे.

सरकारने नियमित परतावा म्हणून आयजीएसटीमधून २३,०४३ कोटी रुपये सीजीएसटीला आणि १९,१३९ कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. शिवाय केंद्राने राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश यांच्यातील ५०:५० गुणोत्तरात आयजीएसटीचा तात्कालिक समझोता म्हणून २४ हजार कोटी रुपये दिले आहेत.

सर्व देणी दिल्यानंतर, ऑगस्ट २०२१ या महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारांना ५५,५६५ कोटी रुपये सीजीएसटीपोटी आणि ५७,७४४ कोटी रुपये एसजीएसटीपोटी मिळाले आहेत.

गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा ऑगस्ट २०२१ मधील महसूल ३०% अधिक आहे. या महिन्यात देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा महसूल याच स्त्रोतांद्वारे ऑगस्ट २०२० मध्ये संकलित महसुलापेक्षा २७% अधिक राहिला.

ऑगस्ट २०१९-२० मधील ९८,२०२ कोटी रुपयांचे महसूल संकलन लक्षात घेतली तर यावर्षी महसूल संकलन १४% नी वाढले आहे.

सलग नऊ महिन्यांपर्यंत १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी संकलन झाल्यानंतर कोरोना महारोगराईच्या दुसऱ्या लाटेमुळे ते जून २०२१ मध्ये कमी होऊन १ लाख कोटी रुपयांपेक्षा कमी झाले.

कोरोना संबंधित निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट २०२१ मध्ये जीएसटी संकलनाने पुन्हा १ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला.

अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याचे हे स्पष्ट निदर्शक असल्याचा दावा मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

महत्वांच्या राज्यातील जीएसटी संकलन

राज्य ऑगस्ट-२० ऑगस्ट-२१ वाढ
१) गुजरात ६,०३० ७,५५६ २५%
२) कर्नाटक ५,५०२ ७,४२९ ३५%
३) तामिळनाडू ५,२४३ ७,०६० ३५%
४) उ.प्रदेश ५,०९८ ५,९४६ १७%
५) प.बंगाल ३,०५३ ३,६७८ २०%

 हे ही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT