Latest

मी कुस्ती खेळताना कधीच अंडरवेअर घातली नाही, इतर दिवशी सुद्धा अजिबात घालत नाही

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी WWE कुस्तीपटू चेल्सी ग्रीन हिने सनसनाटी खुलासा केला आहे. तिने रिंगमध्ये लढत असताना कधीच अंडरवेअर घातली नाही असा सनसनाटी दावा केला आहे.

तिने रिंगमध्ये गेल्या महिन्यात पुन्हा एकदा वापसी केली आहे. तिने अंडरवेअरवरून केलेला खुलाशामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.
चेल्सी ग्रीन ३० वर्षीय तिने दोन वर्ष WWE मध्ये नशीब अजमावले आहे.

२०१८ आणि २०२० मध्ये चेल्सी WWE मध्ये होती, पण या कालावधीत कधीच अंडरवेअर घातली नसल्याचे म्हटले आहे. इतकचं नाही, इतर दिवशी सुद्धा अंडरवेअर घालत नसल्याचा दावा तिने केला.

EWrestingNews शी बोलताना चेल्सी म्हणाली की, माझ्याबद्दल तुम्ही दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत त्या म्हणजे मी कधीही अंडरवेअर घालत नाही. कुस्ती असली तरी मी त्याचा विचार करत नाही. मला अंडरवेअर घालायला कधीच आवडत नाही. त्यापेक्षा लढणं पसंत करेन. मोकळ्या हवेचा अनुभव घेईन. मी नेहमीच या मार्गाने आली आहे.

माझ्या मित्रांना याबाबत माहिती आहे. माझ्या कुटुंबाला सुद्धा माहीत आहे. माझ्या बॉयफ्रेंडला सुद्धा हे माहीत आहे.

चेल्सीने नवीन तीन वर्षाचा करार गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात केला आहे. मात्र मनगट तुटल्याने ती नियोजित वेळापत्रकानुसार सहभागी होऊ शकलेली नाही.

मनगटाच्या दुखापतीमुळे अनेक महिने सक्तीने विश्रांती घ्यावी लागली आहे. ती आता पुर्णत: तंदुरुस्त आहे, पण एप्रिल २०२१ मध्ये WWE ने तिला करारातून मुक्त केलं आहे.

हे ही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT