पुढारी ऑनलाईन डेस्क : आज महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. फडणवीस यांनी फुलेंचं योगदान मोठं असल्याचे यावेळी म्हटले. फडणवीस पुढे म्हणाले- 'कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद उपस्थित होता काम नये. आम्ही जे बोलतो ते करतो. कोविड काळात मविआ सरकारने एका पैशाची सूट दिली नाही. रब्बी काळात वीज कनेक्शन न तोडण्याची सूचना आम्ही दिली. दोन्ही राज्यांनी न्यायालयावर विश्वास ठेवावा.
यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. सत्ता जाताच विमा कंपन्यांवर मोर्चा काढतात. मविआ काळात पिकविमा कंपन्यांना सर्वात जास्त फायदा मिळाला.