FIFA World Cup 2022 Spain vs Germany | चारवेळेचा चॅम्पियन जर्मनीचा मार्ग खडतर, स्पेन विरुद्ध सामना १-१ ने बरोबरीत | पुढारी

FIFA World Cup 2022 Spain vs Germany | चारवेळेचा चॅम्पियन जर्मनीचा मार्ग खडतर, स्पेन विरुद्ध सामना १-१ ने बरोबरीत

FIFA World Cup 2022 Spain vs Germany : फिफा फुटबॉल वर्ल्डकप २०२२ मध्ये जर्मनीसाठी पुढील फेरीत पोहोचण्याचा मार्ग थोडा कठीण झाला आहे. रविवारी रात्री कतारमधील अल बायत स्टेडियमवर खेळलेल्या जर्मनी आणि स्पेन यांच्यातील सामना १-१ ने बरोबरीत राहिला. विशेष म्हणजे या सामन्यातील दोन्ही गोल बदली खेळाडूंनी केले. स्पेनकडून अल्वारो मोराटा याने तर जर्मनीतर्फे निकलास फुलक्रूग याने गोल केला. आता चार वेळचा चॅम्पियन असलेल्या जर्मनीला पुढील फेरीत पोहोचण्यासाठी कोस्टा रिकाला त्यांच्या ग्रुपमधील अंतिम सामन्यात हरवावे लागणार आहे.

सामन्याच्या सुरुवातील दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. स्पेनचे खेळावर वर्चस्व दिसून आले. पण काउंटर अटॅकमध्ये जर्मनीचा संघ मजबूत दिसला. (FIFA World Cup 2022 Spain vs Germany) चारवेळेचा चॅम्पियन जर्मनीला २०१८ मध्येही स्पर्धेतून लवकर बाहेर पडावे लागले होते. त्यावेळी जर्मनी पहिल्या फेरीतच बाहेर पडली होती आणि आता त्यांना कतारमधील वर्ल्डकपमध्ये अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघ गोलशुन्य बरोबरीत होते. दुसऱ्या हाफमध्ये स्पेनच्या अल्वारो मोराटाने ६२व्या मिनिटाला जॉर्डी अल्बाच्या उत्कृष्ट क्रॉसचे गोलमध्ये रूपांतर करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. जर्मनीतर्फे निकलास फुलक्रूग याने गोल केला. फिफा वर्ल्डकपमध्ये निकलास फुलक्रूग हा जर्मनीकडून गोल करणारा पहिला बदली खेळाडू आहे. फुलक्रूगने ८३व्या मिनिटाला मुसियालाच्या पासवर गोल करत स्कोअर १-१ असा बरोबरीत केला. यानंतर दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही आणि सामना अनिर्णित राहिला.

हे ही वाचा :

Back to top button