मुंबई; पुढारी ऑनलाईन : मल्ल्याळम टीव्ही अभिनेता रमेश वलियासाला (Ramesh Waliasala) याचे निधन झाले आहे. त्याचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती सर्वात आधी निर्माते आणि प्रोडक्शन कंट्रोलर एनएम बदूशा यांनी सोशल मीडियावर दिली आहे. मल्ल्याळम टेलिव्हिजन आणि सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
रमेश वलियासाला हे दोन दिवसांपूर्वी नवीन प्रोजेक्टच्या शूटिंगवरून घरी परतले होते. याच दरम्यान त्याचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. यानंतर अनैसर्गिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली असून तपास सुरू आहे.
रमेश वलियासाला यांची आत्महत्या केली आहे की हत्या झाली आहे? असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला आहे. या घटनेची माहिती निर्माते आणि प्रोडक्शन कंट्रोलर एनएम बदूशा यांनी सोशल मीडियावर दिली.
यावेळी त्यांनी म्हटले की, 'खूप समस्या असेल पण जीवनापासून दूर पळून काय फायदा?'. याशिवाय बदूशा यांनी फेसबुकवर लिहिले आहे की, 'माझा प्रिय मित्र रमेश वलियासाला याला श्रद्धांजली.'
रमेश वलियासाला यांनी आपल्या करियरची सुरुवात महाविद्यालयातील नाटकांपासून केली होती. त्यांनी २२ वर्षात वेगवेगळ्या भूमिका साकारत घराघरात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. या धक्क्याने मल्ल्याळम टेलिव्हिजन आणि सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
हेही वाचलंत का?
पाहा व्हिडिओ : गोल्डन बॉय नीरज चोपडा भारावला आपले मोझॅक पोर्ट्रेट बघून