पुढारी ऑनलाईन डेस्क : सकाळच्या नाश्त्याला खोबऱ्याची चटणी आणि सांभारबरोबर मेदू वडा खाणं म्हणजे एक पर्वणीच असते. मेदू वडा (Medu Vada) दाक्षिणात्य पदार्थ असली तर तो आता सामान्यपणे सर्वच राज्यामध्ये नाश्त्याला आवर्जुन खाल्ला जातो. असा हा लोकप्रिय मेदू वडा घरामध्ये बनविणं, जास्त अवघड नाही. तुम्ही ही रेसिपी वाचा आणि आपल्या घरात कुरकुरीत मेदू वडा तयार करा…
मेदू वड्यासाठी लागणारं साहित्य
१) एक कप उडदाची डाळ
२) मध्यम आकारा बारीक चिरलेला कांदा
३) एक चमचा जिरे
४) अर्धा चमचा कुटून घेतलेले काळे मिरे
५) पाच-सहा कढीपत्ता
६) अर्धा चमचा बारीक कापलेले हिरवी मिरची
७) बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर
८) तळण्यासाठी तेल आणि चवीनुसार मीठ
मेदू वडा बनविण्यासाठी ही कृती
१) एक पातेल्यात उडदाची डाळ घेऊन दोन-तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर सुमारे दोन-तीन तास दीड कप पाण्यात भिजत ठेवा. पण, ३ तासांच्या पुढे जास्त वेळी डाळ भिजत ठेवू नका.
२) त्यानंतर भिजलेल्या उडदाच्या डाळीतील पाणी काढून मिक्सरमध्ये संपूर्णपणे बारीक वाटून घ्या. हे बारीक करत असताना थोडं पाणी टाकून पुन्हा बारीक करून घ्या. हे डाळीच पीठ जास्त पातळ होणार नाही, याची काळजी घ्या.
३) डाळीचे हे पीठ एका भांड्यात काढून १-२ मिनिटं चांगलं हलवून घ्या. असं केल्याने त्यात हवी मिक्स होईल, त्यामुळे वडा हलका आणि मऊ होईल.
४) या पीठात बारीक कापलेला कांदा, एक चमचा जिरे, काळे मिरे, कढीपत्ता, बारीक कापलेली हिरवी मिरची, एक चिमुट हिंग, कापलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला. हे सर्व मिश्रण एकजीव होतील, असे हलवून घ्या.
५) यानंतर मध्यम गॅसवर कढई ठेवून तेल गरम करायला सुरू करा. त्यानंतर हाताने ते मिश्रण गोल आकाराचे करून त्याच्या मधोमध आपल्या अंगठ्याने छिद्र पाडून उकळेल्या तेलात हळूच सोडा. एका वेळी कढईमध्ये तीन ते चारच वडे सोडा.
६) व्यवस्थित भाजण्यासाठी तेलातील वडे उलटे-सुलेट करून भाजा. जोपर्यंत या वड्यांना सोनरी रंग येत नाही आणि कुरकुरीत होत नाहीत, तोपर्यंत वडे तळा.
७) मेदू वडे तळून झाले की, त्यातील तेल पूर्णपणे नितळण्यासाठी पेपर नॅपकिनवर ठेवा. त्याच्याने मेदू वड्यांतील तेल नितळून जाईल आणि ते कुरकुरीत होतील. अशाप्रकारे तुमचे कुरकुरीत मेदू वडे (Medu Vada) खाण्यासाठी तयार झाले आहेत.
मुंबईची पावभाजी या रेसिपीची व्हिडीओ पाहिलात का?