Latest

भाजप सरकारला दहशतवादी घाबरले आहेत; संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क: नरेंद्र मोदी २०१४ साली पंतप्रधान झाल्यापासून देशात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. केंद्रात भाजपा सरकार असल्यामुळे दहशतवादी घाबरले आहेत, असा दावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केला. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात ते भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया येथे बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, 'आम्ही दहशतवाद्यांच्या कारवायांना आळा घातला. त्यांना यशस्वी होऊ दिलेलं नाही.

जम्मू-काश्मीर सोडाच, मोदीजी यांचे सरकार आल्यानंतर देशात कुठेही एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. दहशतवादी भाजपा सरकारला घाबरत आहेत.

ही छोटी गोष्ट नाही. दहशतवाद्यांना हे कळून चुकले आहे की,आत्ता जर काही गडबड केली तर त्यांची गय केली जाणार नाही.

उरी हल्ल्यानंतर आम्ही सर्जिकल स्ट्राईक करून जगाला हेच ठणकावून सांगितले आहे.'

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग पुढे म्हणाले, 'मागील ४० वर्षांपासून भारतीय जवान वन रँक वन पेन्शनची मागणी करत आहेत.

मात्र, काँग्रेसला ते जमले नाही. परंतु मोदीजींनी त्याची अंमलबजावणी केली.

भाजपा व काँग्रेस सरकार यांच्यातील फरक यातूनच स्पष्ट होतो. काँग्रेस केवळ महात्मा गांधी यांच्या नावाचा वापर करते, परंतु त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत नाहीत.'

राम मंदिर ही आमची घोषणाबाजी नव्हती, हे आम्ही सिद्ध करून दाखविले आहे, असेही ते म्हणाले.

धडा शिकवू

जेव्हा पुलवामाची घटना घडली तेव्हा आमच्या बहाद्दूर वायूसेनेने बालाकोटमधील अतिरेक्यांच्या ठिकाणांवर हल्ला करून ते नष्ट केले. ही कारवाई सीमेपलिकडे केली. आतंकवादी आता आमच्या सीमेच्या बाहेर आणि सीमेच्या पलिकडूनही कारवाई करू शकत नाहीत. ते जेथून कारवाई करतील तेथे आम्ही त्यांना धडा शिकवू.

गेल्या काही दिवसांपासून स्तुती

गेल्या काही दिवसांपासून राजनाथ सिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची स्तुती करताना दिसत आहेत. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी जनतेपर्यंत सरकारची कामे सांगावीत असे आदेश मोदी यांनी दिले आहेत. त्यासाठी नव्या मंत्र्यांनी जनआशीर्वाद यात्राही केली होती.

हेही वाचा: 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT