विराट काेहली : सर्वात जलद २३ हजार धावा करणाला फलंदाज

विराट काेहली : सर्वात जलद २३ हजार धावा करणाला फलंदाज
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : लंडनच्या ओव्हल मैदानात विराटने आपल्या नावावर एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. चौथ्या कसोटी सामन्यात विराट काेहली एक धाव काढताच त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २३ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३००० धावा करणारा विराट हा भारताचा तिसरा फलंदाज ठरला.

कोहलीने आतापर्यंत ४३९ सामन्यांच्या ४८९ डावांमध्ये २२९९९ धावा केल्या होत्या. त्याची सरासरी ५५.२८ होती. त्याला २३ हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी एका धावेची गरच होती. ओव्हलच्या मैदानात एक धाव पुर्ण करताच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.

याआधी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी २३ हजार धावाचा टप्पा पार केला होता. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३४३५७ धावा आहेत. भारताचा द वॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४०६४ धावा आहेत.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजार धावा काढण्याच्या बाबतीत विराट काेहली सातव्या क्रमांकावर आहे.

कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिेकेटमध्ये सर्वात जलद 23 हजार धावा पूर्ण

चौथ्या कसोटीत कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजार धावा पूर्ण करून एक खास विश्वविक्रमही आपल्या नावावर केला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २३ हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज बनला आहे. त्याने केवळ ४९० डावामध्ये २३ हजार धावा पुर्ण केल्या आहेत. सचिन तेंडुलकरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५२२ डाव खेळून २३००० धावा केल्या आहेत. यामध्ये रिकी पाँटिंगने आपल्या कारकिर्दीतील ५४४ डावांमध्ये, जॅक कॅलिसने ५५१ तर श्रीलंकेच्या कुमार संगकाराने ५६८ डावामध्ये 23 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

विराटने धोनीचाही एक विक्रम मागे टाकला

विराट कोहलीने कर्णधार म्हणून धोनीचाही एक विक्रम मोडला आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत कोहलीने इंग्लंडविरूध्द सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्व करणारा भारतीय कर्णधार बनला आहे. इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून कोहलीचा हा १० वा सामना आहे. यापूर्वी इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून धोनीने ९ कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले होते.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा कसोटी (ENG vs IND 4th Test )सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत लॉर्ड्सवर विजय मिळवला. तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने लीड्समध्ये भारताचा पराभव करून मालिका बरोबरीत आणली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news