Latest

‘बबीता’ ने लिहिलं खुलं पत्र, ‘स्वत:ला भारताची मुलगी म्हणण्यास लाज वाटतेय’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : तारक मेहता का उल्टा चश्मा या लोकप्रिय मालिकेतील 'बबीता' चर्चेत आलीय. मुनमुन दत्ता या अभिनेत्रीने तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत 'बबीता' हिचे पात्र साकारलं आहे. ती आणि टप्पू यांच्यावरून गोंधळ सुरू आहे. नेमकं काय प्रकरण घडलंय पाहूया.

तिचं सौंदर्य आणि अभिनयाची दिलकश अदा पाहून मुनमूचे फॅन्स दिवाने झाले आहेत. पण, कधी-कधी कलाकारांना नसत्या भानगडींना सामोरं जावं लागतं. कधी -कधी त्यांचे खूप कौतुक होतं. तर कधी कधी त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

अनेकदा मुनमुन आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलीय. पुन्हा एकदा मुनमुनने सोशल मीडियावर अशी पोस्ट केली आहे की, नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

मुनमुन लिहिते-

मुनमुनने एक खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रात तिने म्हटलंय की, तिला स्वत:ला भारताची मुलगी म्हणण्यास लाज वाटतेय.
मुनमुनने आपल्या खुल्या पत्रात लिहिलंय- सामान्य माणसांसाठी. मला आपल्याकडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा होती. परंतु, ती घाण जी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकलीय. ते वाचल्यानंतर हे सिध्द होतं की, आपण, शिक्षित असूनदेखील अशा समाजाचा भाग बनू शकलो नाही. तो समाज खालच्या पातळीवर चाललाय.

महिलांना नेहमी त्यांच्या वयावरून हिणवलं जातयं. तुमच्या या प्रकारच्या गोष्टींनी एखाद्याच्या जीवनावर काय घडतंय? कोणालाही मानसिकरित्या त्रास देण्यासाठी ही गोष्ट पुरेशी आहे. याची चिंता तुम्हाला कधीचं नाही होणार. मी लोकांचे मागील १३ वर्षांपसून मनोरंजन करत आहे. परंतु, १३ मिनिटे लागले नाहीत, माझ्या आत्मसन्मान तोडायला.

मुनमुन पुढे लिहिते, आता पुढीलवेळी जर कुणी इतकं डिप्रेस झालं तर तो स्वत:चा जीव घेईल. तर थांबून एकदा विचार करा की, तुमचे शब्द त्याला अंतकडे घेऊन जात आहेत का ? आज मला स्वत:ला भारताची मुलगी म्हणताना लाज वाटत आहे.

काय आहे प्रकरण?

इतकंच नाही तर मुनमुनने मीडियावरदेखील संताप व्‍यक्‍त केला आहे. सोशल मीडियावर मुनमुन दत्ता आणि अभिनेता राज अनादकट यांचं डेटिंग सुरू असल्याचे वृत्त पसरले. विशेष म्हणजे राज २४ वर्षांचा तर मुनमुन ३२ वर्षांची आहे. त्यामुळे ती चर्चेत आली. मुनमुन आपल्यापेक्षा ९ वर्षांनी लहान राज अनादकटला डेट करत आहे. अशी चर्चा सुरू झाली. यानंतर तिने खुले पत्र लिहून सर्वांचा समाचार घेतला.

एका एपिसोडसाठी घेते इतके मानधन

मुनुमन एका एपिसोडसाठी ३५ ते ५० हजार रुपये घेते. मुनमुनला तिचे पहिले मानधन १२५ रुपये मिळाले होते. ६ वर्षाच्या वयात तिने अभिनयात डेब्यू केला होता. मुनमुनचा जन्म १९८७ मध्ये पश्चिम बंगाल येथे दुर्गापूरमध्ये झाला होता.

हेही वाचलं का ? 

SCROLL FOR NEXT