Latest

पुण्यात दुकाने 8 वाजेपर्यंत सुरू राहणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

backup backup

पुणे पुढारी वृत्तसेवा : पुण्यात दुकाने 8 वाजेपर्यंत दुकाने सुरू तसेच, विकेंड लॉकडाऊनमधील एक दिवस लॉकडाऊन रद्द करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केले. मागील बैठकीत मुख्यमंत्र्यांशी पुण्यात 4 वाजेपर्यंत असलेले दुकानांचे निर्बंध उठवून 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याविषयी चर्चा झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी याला सकारात्मकता दर्शविली आहे. मात्र, पुणेकरांनी कोरोनासंदर्भातील नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. याबाबतचे आदेश लवकरच निघतील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले.

पुणे महानगरपालिका हद्दीत वनाज ते आयडीयल कॉलनी दरम्यान शुक्रवारी ट्रायल रन घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी नागरिकांची मागणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडत, लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यासंदर्भात चर्चा केली असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुध्दा या चर्चेला सकारात्मकता दर्शविली असून, लवकरच यासंदर्भातील आदेश काढण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

परंतु, ग्रामीण भागात मी दौरा केला असताना मला स्वत:ला ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या अजूनही वाढत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी समजून आणि स्वत:च्या रक्षणासाठी काळजी घ्यायला हवी, असे सांगत, उपमुख्यमंत्री पवार यांनी ग्रामीण भागात निर्बंध कायम राहणार असल्याचे संकेत दिले.

ग्रामीण भागातील निर्बंध जैसे थे..

पवार म्हणाले की, ग्रामीण भागात मी दौरा केला आहे. तेथे नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या अजूनही वाढत आहे. या भागातील नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी समजून काळजी घ्यायला हवी. असे सांगत ग्रामीण भागातील निर्बंध काय राहणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरु..

SCROLL FOR NEXT