Latest

पुणे : गुण वाढवण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या क्लार्कची काढली धिंड!

backup backup

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे येथील एका नामांकित महाविद्यालयातील क्लार्कने विद्यार्थिनीला परिक्षेतील गुण वाढवून देतो असे सांगत शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

सतत होणार्‍या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने घरच्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर घरच्यांनी थेट महाविद्यालयात धाव घेत संबंधित व्यक्तीला चोप दिली. त्यानंतर रस्त्याने धिंड काढून पोलिसांच्या हवाली केले.

अधिक वाचा

अभिजित हरिभाऊ पवार (वय ३४,रा. वडगाव बुद्रुक, जि. पुणे ) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पवार हा महाविद्यालयातील क्लेरिकल विभागात काम करत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय टिकोळे यांनी सांगितले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थीनी ही शहरातील एका नामांकित विद्यालयात शिक्षण घेते. आरोपी पवार हा याच विद्यालयातील क्लारिकल विभागात काम करतो.

अधिक वाचा 

त्याची तेथे नेमणूक एका खासगी संस्थेमार्फत झाली आहे. विद्यार्थिनीला मार्क वाढवून देतो म्हणून त्याने शरीर सुखाची मागणी केली.

विरोधानंतर देखील तो सतत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत होता.

शेवटी सतत होणार्‍या त्रासाला कंटाळून तिने घरच्यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

घरच्यांनी थेट विद्यालयात धाव घेत पवारला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याची धिंड काढून विश्रामबाग पोलिसांच्या हवाली केले.

हे ही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT