Latest

नवजात अर्भक आळंदीत येऊन सोडण्याचे प्रमाण वाढले

backup backup

आळंदी; पुढारी वृत्तसेवा : आळंदी शहर जणू चिमुकली नवजात अर्भक बेवारस अवस्थेत सोडण्याचे ठिकाणच बनले आहे का? असा सवाल उपस्थित व्हावा अशा घटना तीन ते चार वेळा घडल्या आहेत.

रविवारी (दि.१) रात्री पावणे बाराच्या सुमारास नवजात अर्भक सोडण्याची अशीच एक घटना आळंदी-मरकळ रस्त्यावर धानोरी फाटा भागात उघडकीस आली. तीन दिवसांच्या बाळाला टाकून अज्ञात पसार झाले. याबाबत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली आहे.

देवेशनाथ महेशनाथ चौहान (वय २०, रा. धानोरी फाटा, मरकळ रोड, आळंदी) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 5) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी फाटा, मरकळ रोड येथे शिव इंजीनियरिंग या कंपनी समोरील रस्त्याच्या बाजूला अज्ञातांनी दोन ते तीन दिवस वय असलेल्या पुरुष जातीच्या बाळाला सोडून दिले.

त्या बाळाचे पालनपोषण व सांभाळ करण्याचे कर्तव्य असताना अज्ञातांनी त्याचा पूर्णपणे परित्याग केला. बाळाला रस्त्याच्या कडेला सोडून अज्ञात आरोपी पसार झाले आहेत.पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.

हे ही वाचलं का?

SCROLL FOR NEXT