Latest

जीन्स घातल्याने घेतला तरुणीची हत्या; आजोबा आणि चुलत्याने केली मारहाण

backup backup

पुढारी ऑनलाईन, लखनऊ: जीन्स का घातली म्हणून एका १७ वर्षीय तरुणीचा चुलता आणि आजोबाने खून केल्याची खळबळजनक घटना देवरिया जिल्ह्यात घडली. जीन्स घालू नको, असे सांगत तिला प्रचंड मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला.

अधिक वाचा:

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील एक १७ वर्षीय तरुणी लुधियाना येथे आपल्या कुटुंबासह राहत होती. ती आपल्या गावी परतल्यानंतर तिला चुलता आणि आजोबाने पारंपरिक वेषभूषा करण्यास सांगितले. मात्र, त्यास तिने नकार दिला.

वाद वाढत गेला आणि चुलता आणि आजोबाने तिला मारहाण केली. यात तिला भिंतीवर ढकलून दिले. यात ती गंभीरजखमी झाली. त्यात तिचा मृत्यू झाला.

अधिक वाचा:

संशयितांना या तरुणीचा मृतदेह कासिया-पटना राज्यमार्गारील पाटनवा पुलावर फेकून दिला. मात्र, मृतदेह ग्रीलमध्ये अकडला. कित्येक तास हा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. पादचाऱ्यांनी तो पाहून पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंब लुधियाना येथे राहत होते. तेथे ती पँट आणि टॉप घालत हाती. जेव्हा ती तरुणी आणि तिची आई गावी परतल्या तेव्हा घरातील काहींनी तिच्या पेहरावाला विरोध केला.

अधिक वाचा:

तिला भारतीय पेहराव करण्यासाठी दबाव आणला. मात्र, तिने नकार दिल्याने मारहाण करण्यात आली. त्यात तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मुलगीचे आजोबा आणि एका रिक्षाचालकाला अटक केली आहे. तिचा चुलता अद्याप पसार आहे.

अधिक वाचा:

पहा व्हिडिओ:  गायी पाळणाऱ्या मुंग्या

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT