Latest

गांजा : पुण्यात तब्बल १८०० किलो गांजा जप्त; डीआरआय पथकाची कारवाई

backup backup

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अननसाची वाहतुक करत असल्याचे भासवून अननसाखाली गांजा तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्युव्ह इंटेलिजन्सच्या (डीआरआयच्या) पुणे पथकाने उघडकीस आणला.

पथकाने पावणे चार कोटींचा तब्बल 1 हजार 878 किलो अवैधरित्या वाहतूक होत असलेला गांजा पकडला. पोलीसांनी सहा जणांना अटक केली आहे.

अधिक वाचा

विलास पवार, अभिषेक घावटे, विनोद राठोड, राजु गोंधवे, श्रीनिवास पवार आणि धर्मराज शिंदे (रा. महाराष्ट आणि तेलंगना) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

डीआरआच्या पुणे पथकाला दोन वाहनांमध्ये गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. यामधील एक वाहन ट्रक तर दुसरे वाहन हे मारूती सियाज कार असे समजले होते.

गुरूवारी पुणे सोलापूर रस्त्यावरून येणार्‍या ट्रकला व कारला डीआरआय पथकाने ससून रूग्णालयाजवळील जीएसटी कार्यालयाजवळ थांबविले.

सुरूवातीला ट्रकची तपासणी केली असता त्या ट्रकमध्ये तपास पथकाला अननसाने भरलेला ट्रक आढळला.

अधिक वाचा 

त्यानंतर अननस बाजूला काढून पाहिली.  त्याखाली गांजाने खच्च भरलेली पोती व ट्रकच्या केबिनमध्ये अशी 40 पोती गांजा सापडला.

कारचा वापर गांजाची वाहून नेण्यासाठी करण्यात येणार होता.

1 हजार 878 किलो गांजा यावेळी जप्त करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर गांजा पकडला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.

डीआरआय पथक हे अवैध होणार्‍या तस्करी विरोधी व अंमली पदार्थ विरोधी कारवाई करते.

हे ही वाचलं का?

पाहा व्हिडिओ : यम भाईची मस्ती पोलिसांनी उतरवली 

https://youtu.be/0r76elg4NLE

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT