Latest

अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन, वयाच्या ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेते अनुपम श्याम यांचे मुंबईत रविवारी निधन झाले. ते ६३ वर्षाचे होते. अनुपम श्याम यांच्या शरिरातील अनेक विविध अवयवांनी काम करणे थांबवले होते. टीव्हीवरील प्रतिज्ञा मालिकेत ठाकूर सज्जन सिंहची भूमिका त्यांनी साकारली होती. ते गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजारापासून त्रस्त होते.

अनुमप यांना आयसीयूत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या शरिरातील अनेक अवयव काम करत नव्हते.

त्यांना गेल्या वर्षी मार्चमध्ये किडनी आजाराची समस्या उद्भवली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या उपचाराचा खर्च पाहता त्यांच्या भावाने आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.

अनुपम यांना नियमित डायलिसिसवर ठेवण्यात आले होते. यावर्षी २०२१ मध्ये 'मन की आवाज प्रतिज्ञा' मालिकेचा सीझन २ लाँच झाल्यानंतर ते पुन्हा शुटिंगसाठी परतले होते. शुटिंग पूर्ण केल्यानंतर ते आठवड्यातून तीन वेळा डायलिसिससाठी जात होते.

अनुमप यांनी यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते की, आपली तब्येत साथ देत नाही. तरीही 'प्रतिज्ञा २'मध्ये ठाकूर सज्जन सिंहची भूमिका साकारली. कारण ही भूमिका मला खूप आवडली होती.

मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये आपण चाहत्यांना निराश करु शकत नाही. जीवनाची लढाई लढत आहे. पुन्हा परत आलो असून आता 'प्रतिज्ञा'च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर जात आहे.

अनुमप श्याम उत्तर प्रदेशमधील प्रतापगढचे रहिवाशी आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९९३ मध्ये केली. त्यांनी लखनौ येथील भारतेंदू ॲकॅडमी ऑफ ड्रॉमेटिक ऑर्टसमध्ये शिक्षण घेतले आहे.

त्यांनी 'दस्तक', 'दिल से', 'लगान', 'गोलमाल' आणि 'मुन्ना मायकल' सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

'मन की आवाज प्रतिज्ञा' शिवाय 'रिश्ते', 'डोली अरमानों की', 'कृष्णा चली लंदन' आणि 'हम ने ले ली शपथ' सारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT