मुंबई: पुढारी वृत्तसेवा : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिल्लक जागांवर प्रवेश देण्यासाठी आणखी एक संधी दिली जाणार आहे. मुदतीत अर्ज सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा घेण्यासाठी उद्यापर्यन्त ऑनलाईन अर्ज करू शकतात. ( ITI Admission )
संबधित बातम्या
उद्या म्हणजे, शनिवारी (दि. ७ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचे आहेत त्यांना नोंदणी करता येणार आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना अर्जामध्ये दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज शुल्क भरणे, अर्ज निश्चिती आदी प्रोसेस करता येणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता एकत्रित गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
८ ते १० ऑक्टोबर या काळात रिक्त जागांवर संस्थास्तरीय समुपदेश प्रवेश दिले जाणार आहेत. या फेरीसाठी व्यक्तिश: मूळ कागदपत्रासह विद्यार्थ्यांना संस्थेत उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने म्हटले आहे. ( ITI Admission )
हेही वाचा :