Asian Championship : एशियन चॅम्पियनशिप शूटिंग स्पर्धेसाठी सानिया सापळेची निवड | पुढारी

Asian Championship : एशियन चॅम्पियनशिप शूटिंग स्पर्धेसाठी सानिया सापळेची निवड

गारगोटी : पुढारी वृत्तसेवा : येथील सानिया सुदेश सापळे हिची एशियन चॅम्पियनशिप ( Asian Championship ) शूटिंग या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पॉईंट टू टू ५० मीटर प्रोन रायफल शूटिंग प्रकारात भारतीय संघाची प्रतिनिधीत्व करणारी एकमेव ज्युनिअर महिला आहे. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने तिची निवड झाली आहे.

संबधित बातम्या 

आंतरराष्ट्रीय स्तरावर पॉईंट टू टू ५० मीटर या प्रकारात निवड होणारी सानिया तालुक्यातील पहिली विद्यार्थिनी आहे. सानिया रायफल शूटिंगमध्ये गेली तीन वर्षे कामगिरी करत आहे. एन. आर. ए. आय. इंडियाच्या वतीने तिची पाच वेळा शूटिंग चाचणी घेतली. या चाचणी तिने उत्तम कामगिरी केल्याने तिची निवड झाली आहे.

दक्षिण कोरिया येथे १९ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर दरम्यान स्पर्धा होणार आहेत. ती सद्गुरुदास यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असुन केआयटी अभियांत्रिकीत द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. तिला राधिका बराले, रोहित हवालदार व आईवडिलांचे मार्गदर्शन लाभले आहे. ( Asian Championship )

हेही वाचा : 

Back to top button