Latest

 world’s richest person : एलॉन मस्कला मागे ढकलून ‘हे’ बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार सोमवारी (दि.१२) टेस्लाचे शेअर्स झपाट्याने घसरल्यानंतर ट्विटरचे नवीन बॉस आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यापुढे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले नाहीत. एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (world's richest person ) नाहीत. मग जगातील श्रीमंत व्यक्ती कोण असा प्रश्न पडला असेल तर 'लुई व्हिटॉनचे सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट' हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

टेस्लाच्या शेअरच्या किमतीत घट

फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार ज्या कंपनीचा सीईओ एलॉन मस्क आहे त्या टेस्लाच्या शेअर्सच्या किमतीत घट झाल्यानंतर त्याच्या नावावर असलेलं जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे बिरुद आता मागे पडले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे बिरुद आता लुई व्हिटॉनचे सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्याकडे गेले आहे. सविस्तर अशी माहिती की, टेस्लाचे शेअर्स 6.3 टक्क्यांनी झपाट्याने घसरल्यानंतर आणि सोमवारी (दि.१२) LVMH स्टॉकची किंमत एकाच वेळी वाढल्यानंतर अरनॉल्टने मस्कला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून पाठीमागे टाकले. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकल्यानंतर सप्टेंबर २०२१ पासून मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते.

world's richest person : कोण आहेत बर्नार्ड अर्नॉल्ट ?

बर्नार्ड अर्नॉल्ट हे फ्रेंच व्यापारी आणि एलव्हीएमपी (LVMH) मोएट हेनेसीचे अध्यक्ष आणि लुईओस विटन समूहाचे सीईओ आहेत. या समूहाकडे डोम पेरिग्नॉन (वाइन्स), लुई व्हिटन, फेंडी, मार्क जेकब्स (कपडे) आणि रिहाना (मेक-अप)च्या फेंटी ब्युटीसह सुमारे 70 कंपन्यांची मालकी आहे. त्यांची चार मुले एलव्हीएमपीच्या उद्योग विस्तारात वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत.  बर्नार्ड अर्नॉल्ट 1971 मध्ये वडिलांच्या कन्स्ट्रक्शन फर्म फेरेट-सव्हिनेलमध्ये आले. आठ वर्षानंतर, त्याने कंपनीचे नाव बदलून Ferinel Inc. केले आणि त्याचे लक्ष रिअल इस्टेटकडे वळवले.  तर 1979 मध्ये अरनॉल्ट कंपनीचे अध्यक्ष झाले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT