Clean Energy : भविष्यात पेट्रोल-डिझेल गॅसची उरणार नाही गरज? न्यूक्लिअर फ्यूजनचा प्रयोग यशस्वी… | पुढारी

Clean Energy : भविष्यात पेट्रोल-डिझेल गॅसची उरणार नाही गरज? न्यूक्लिअर फ्यूजनचा प्रयोग यशस्वी...

पुढारी ऑनलाइन डेस्क : Clean Energy : अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीच्या नॅशनल इग्निशन फॅसिलिटीमध्ये अमेरिकन शास्त्रज्ञांनी अणु संलयन प्रतिक्रिया यशस्वीपणे तयार केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात स्वच्छ ऊर्जा (कार्बन फ्री एनर्जी) तयार झाली, ज्याचा उपयोग अनेक प्रकारच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाऊ शकतो. अमेरिकेच्या ऊर्जा विभागानेही हा प्रयोग यशस्वी झाल्याची घोषणा केली आहे.

सध्या वापरात येणारी उर्जा साधने आणि त्यातून निर्माण होणा-या कार्बन मुळे जलवायू परिवर्तनाचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक देश सौर उर्जा, पवन उर्जेसारख्या ग्रीन उर्जा निर्मितीकडे वळले आहे. मात्र, ही उर्जा बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संसाधनाची आवश्यकता असते. तसेच खर्चही थोडा जास्त असतो. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ अनेक दशकांपासून न्यूक्लिअर फ्यूजनचा अभ्यास करत आहे. जी कार्बनमुक्त ऊर्जा असेल. तसेच कमीत कमी संसाधनांमध्ये जास्तीत जास्त उर्जा निर्माण होईल. या उर्जेमुळे अणूभट्ट्यांमध्ये सध्या निर्माण होत असलेल्या अणू कच-याशिवाय अमार्यादित कार्बनमुक्त उर्जा मिळेल. या फ्यूजन प्रकल्पात प्रामुख्याने ड्युटेरियम आणि ट्रिटियम या घटकांचा वापर करतात. हे दोन्ही हायड्रोजनचे समस्थानिक आहेत.

Clean Energy :  न्यूक्लियर फ्यूजन ही मानवनिर्मित प्रक्रिया आहे. यामध्ये सूर्याला शक्ती देणारी ऊर्जा कृत्रिमरित्या तयार केली जाते. जेव्हा दोन किंवा अधिक अणू मोठ्या अणूमध्ये सामील होतात तेव्हा न्यूक्लियर फ्यूजन होते. या प्रक्रियेत उष्णतेच्या स्वरूपात प्रचंड ऊर्जा निर्माण होते. कार्बन डायरेक्टचे मुख्य शास्त्रज्ञ आणि लॉरेन्स लिव्हरमोरचे माजी मुख्य ऊर्जा तंत्रज्ञ ज्युलिओ फ्रेडमन म्हणाले की, एक ग्लास पाणी-समतुल्य ड्युटेरियम थोड्याशा ट्रिटियममध्ये मिसळून एका वर्षासाठी घराला ऊर्जा देऊ शकते. ट्रिटियम दुर्मिळ आणि प्राप्त करणे अधिक आव्हानात्मक आहे.

तथापि, ते कृत्रिमरित्या तयार केले जाऊ शकते. कोळशाच्या विपरीत, आपल्याला फक्त थोड्या प्रमाणात हायड्रोजनची आवश्यकता असते. हायड्रोजन ही विश्वात आढळणारी सर्वात मुबलक गोष्ट आहे. हायड्रोजन पाण्यात आढळतो, त्यामुळे ही ऊर्जा निर्माण करणारा पदार्थ अमर्यादित असतो आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जाही स्वच्छ असते.

Clean Energy : शास्त्रज्ञांच्या मते, जर सर्वकाही सुरळीत झाले तर अमेरिकेचे गॅस, पेट्रोल आणि डिझेल यांसारख्या जीवाश्म ऊर्जेवरील अवलंबित्व कमी होऊ शकते. त्याचे सर्वाधिक नुकसान सौदी अरेबिया, रशिया, कतार, ओमान, नायजेरिया या तेल उत्पादक देशांना होऊ शकते.

हे ही वाचा :

ट्विटरवरील मतांना जास्त किंमत : अनघा लेले

जलयुक्त शिवार अभियान पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

Back to top button