Latest

इम्रान खान यांना द्यावा लागणार राजीनामा? पाकिस्तान लष्कर प्रमुखही नाराज

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानात जोरदार राजकीय उलथापालथ होत आहे. पाकिस्तान संसदेतील विरोधी पक्षाला अपेक्षा आहे की, उद्या संसदेचे अध्यक्ष आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अविश्वासाचा ठराव मांडला जाईल. जर हा ठराव स्वीकारण्यास विरोध केला किंवा उशीर केला तर सचिवालयात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही विरोधी पक्षाने दिला आहे.

सोमवारी अध्यक्षाद्वारे ठराव स्वीकारला गेला, तर या अविश्वासाच्या ठरावावर संसदेत मतदान केले जाईल. पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर राजकीय दबाव वाढत आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा आणि डीजी लेफ्टनंट जनरल नदीम अंजुनम यांच्यासहीत चार वरिष्ठ लष्कर प्रमुखांनी ओआयसी-एफएमच्या संमेलनानंतर इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून पायउतार होण्यास सांगतील, अशी चर्चा पाकिस्‍तानमधील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पाकिस्तानच्या तहरिक-ए-इन्साफ (PPI) पक्षाचे माजी लष्कर प्रमुख राहील शरीफ यांनीही लष्कर आणि इम्रान खान यांच्यातील मध्यस्तीमध्ये यश आलेले नाही. अशीही माहिती समोर येत आहे की, जनरल शरीफ इम्रान खान यांच्या सांगण्यानुसार जनरल बाजवा यांच्याकडे भेटायला गेले होते. पण, त्या लष्कर प्रमुखांना समजवू शकले नाहीत.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार,   पाकिस्तान लष्कर या निष्कार्षापर्यंत आले आहे की, इम्रान खान यांनी पंतप्रधानपद सोडावं. कारण, त्यामुळे पाकिस्तानमध्ये राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या पाकिस्तान हे गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. इम्रान खान यांनी युक्रेन संकटावर घेतलेली भूमिका, युरोपीय संघात अनावश्यक पाॅटशाॅटमुळे पाकिस्तानातील लष्कर आणि विरोधी पक्ष नाराज झालेला आहे. पाकिस्तानद्वारे भरविण्यात आलेल्या ओआयसी संमेलनानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यायला हवा, त्यासाठी विरोधी पक्षाने संपूर्ण ताकद लावली आहे.

हेही वाचलं का?

SCROLL FOR NEXT