देशभरात कोरोनाचे १ हजार ७६१ नवे रुग्ण ; १२७ रुग्णांचा मृत्यू | पुढारी

देशभरात कोरोनाचे १ हजार ७६१ नवे रुग्ण ; १२७ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील कोरोना रूग्णांची (Corona)संख्या हळूहळू घसरू लागली आहे. देशभरात मागील २४ तासांत कोरोनाचे १ हजार ७६१ नवे रूग्ण आढळले. कोरोनातून बरे झालेल्या ३ हजार १९६ रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. १२७ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात आतापर्यत एकूण ४ कोटी, ३० लाख, ७ हजार ८४१ रुग्ण आढळले आहेत. तर मृतांचा आकडा एकूण ५ लाख, १६ हजार ४७९ वर पोहोचला आहे. ४ कोटी, २४ लाख, ६५ हजार १२२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २६ हजार २४० सक्रीय रूग्णांची संख्या आहे.

आतापर्यंत १८१ कोटींहून अधिक लसीचे डोस दिले

देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत १८१ कोटींहून अधिक कोरोना (Corona) प्रतिबंधक लसींचे डोस देण्यात आले आहेत. शनिवारी १५ लाख ३४ हजार ४४४ लसीचे डोस देण्यात आले. आतापर्यंत लसीचे १८१ कोटी २७ लाख ११ हजार ६७५ डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना २ कोटींहून अधिक (२,१७,३३,५०२) प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्या आहेत. देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेला १६ जानेवारी २०२१ रोजी सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. कोरोना योद्धा यांच्यासाठी २ फेब्रुवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.

दिल्लीत कोरोनाचे ६२ रुग्ण

देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोना परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाचे रूग्ण १०० पेक्षा कमी आढळून येत आहेत. शनिवारी कोरोनाचे ६२ नवे रूग्ण आढळून आले. आता कोरोना रूग्णांची संख्या आणि मृतांचा आकडाही कमी येऊ लागला आहे. त्यामुळे रूग्णालयावरील तणाव पहिल्यापेक्षा कमी झाला आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : ‘झुंड’ मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

 

Back to top button