Latest

राजकारणाला क्षणभर ‘विश्रांती’! ममता बॅनर्जींचा वर्कआउट करतानाचा व्हिडिओ व्हायरल

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : "काही दिवस तुम्हाला काही अतिरिक्त प्रेरणा आवश्यक आहे!" असं कॅप्शन देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  यांनी रविवारी (दि.८) साेशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. कॅप्शन नंतर त्यांनी कुत्र्याच्या पिल्लाची इमोजीही दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्‍हायरल हाेत आहे.  ( Mamata Banerjee workout video )

Mamata Banerjee workout video  : अतिरिक्त प्रेरणा आवश्यक आहे….

ममता बॅनर्जी यांनी रविवारी (दि.७) ट्रेडमिलवर चालतानाचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला . या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिली आहे की,  "काही दिवस तुम्हाला काही अतिरिक्त प्रेरणा आवश्यक आहे!" आणि  कुत्र्याच्या पिल्लाची इमोजी दिली आहे. या व्हिडिओला  ३१,००० हून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी पांढरी साडी परिधान केली आहे. आणि कुत्र्याच्या पिल्लाकडे पाहत-पाहत ट्रेडमिलवर चालत आहेत.

केंद्रीय राजकारणात सध्‍या भाजप विराेधी पक्ष एकजूट करत आहेत. यामध्‍ये बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची नावे आघाडीवर आहेत. आक्रमक विराेधी पक्ष नेत्‍या अशी ओळख असणार्‍या ममता बॅनर्जी  यांच्‍या वर्कआउट करतानाचा व्हिडिओ तृणमूल काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्ते यांना प्रेरणा देणारा ठरल्‍याची चर्चा आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT