पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पाठिंबा दिलेल्या शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जंतर मंतरवर पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून टाकले. हरियाणा तसेच पंजाबमधील शेतकरी संघटना तसेच खाप पंचायतींचे सदस्य मागील काही दिवसांपासून कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी जंतर मंतरवर ठाण मांडून आहेत.
लैंगिक शोषणाचा आरोप झालेल्या बृजभूषण सिंग यांना 15 दिवसांच्या आत अटक केली नाही तर देशभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी नुकताच आंदोलन स्थळी जाऊन केंद्र सरकारला दिला होता. हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सामील होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान दिल्लीतील टिकरी तसेच अन्य सीमांवरील सुरक्षा पोलिसांनी वाढविली आहे.
हेही वाचा :