सभापती पदासाठी कोणाचे पारडे जड? : आमदार प्रा. राम शिंदे ,आमदार रोहित पवार यांच्यात रस्सीखेच

सभापती पदासाठी कोणाचे पारडे जड? : आमदार प्रा. राम शिंदे ,आमदार रोहित पवार यांच्यात रस्सीखेच
Published on
Updated on

जामखेड (नगर ) : पुढारी वृतसेवा :  जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला समसमान 9-9 जागा मिळाल्याने सभापती कोणत्या गटाचा होणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. बाजार समितीच्या सभापतीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे 16 मेपर्यंत वाट पहावी लागणार आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत आमदार प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार यांच्यात रस्सीखेच होणार आहे. त्यातच डॉ. भगवान मुरूमकर यांनी सभापतीपदाची जबाबदारी डॉ. सुजय विखेंची असल्याचे सांगत आजून राजकीय वातावरण तापवले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपने चांगलीच मुसंडी मारत नऊ जागांवर उमेदवार निवडणून आणण्यात आमदार प्रा. राम शिंदे यांना यश आले.

आमदार शिंदे यांच्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ यांची साथ मोलाची ठरली. तर, आमदार रोहित पवारांबरोबर जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी ही निवडणूक एकत्र लढवली. या निवडणुकीत सेवा सोसायटी मतदार संघात 11 पैकी सात जागा मिळवत यश आले. व्यापारी मतदार संघाच्या दोन्ही जागावर आमदार पवारांचे वर्चस्व राहिले. त्यामुळे आमदार पवार यांना नऊ जागांवर समाधान मानावे लागले. तसेच, भाजपला सोसायटी मतदार संघात 11 पैकी चार, तर ग्रामपंचायत मतदारसंघात चारपैकी चार जागा मिळाल्या, तर हमाल मापाडी मतदार संघात एक जागा मिळाली.

आमदार प्रा. राम शिंदेंना अशा नऊ जागांवर यश आले. जामखेड बाजार समितीमध्ये पूर्ण बहुमत कुणालाच नसल्याने दोन्ही गटाला समान जागा मिळाल्याने ईश्वरी चिठ्ठी निघणार की घोडेबाजार होणार? हे पाहणे ऐस्तुक्याचे ठरणार आहे. परंतु, ग्रामपंचायत मतदारसंघात आमदार पवार यांना एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे आमदार रोहित पवारांना 18 जागांपैकी नऊ जागांवर समाधान मानावे लागले. तर, आमदार प्रा. राम शिंदेंना व्यापारी मतदार संघात दोनपैकी एकही जागा मिळाली नसल्याने व्यापार्‍यांनी आमदार शिंदेंना डावलले असल्याचे चित्र आहे.

दोन्ही आमदारांचा कस लागणार
बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही आमदारांना मतदारांनी समतोल निकाल दिला आहे. या निकालामुळे आगामी निवडणुकातही आमदार पवार, आमदार शिंदे यांचा चांगलाच कस लागणार हे मात्र निश्चित.

जबाबदारी डॉ.सुजय विखेंची : डॉ. मुरूमकर
जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नऊ जागांवर यश मिळाले, तर विरोधी गटात खासदार डॉ. विखे यांचे दोन समर्थक असल्याने आता सभापतीपदाची जबाबदारी डॉ. सुजय विखे यांच्यावर असल्याचे मत पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांनी 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news