पुढारी ऑनलाईन : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या (पीआयए) विमानाने भारतीय हवामान हद्दीत प्रवेश केला. यानंतर भारतीय हद्दीत घुसलेले हे विमान तब्बल १० मिनिटे हवेतच घिरट्या घातल्या. त्यानंतर वैमानिकाने हे विमान पंजाबमधील तरण साहिबच्या नौशेहरा पन्नुआन या गावातून मागे वळले, असे वृत्त 'एनडीटीव्ही'ने दिले आहे.
द न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, ४ मे रोजी रात्री ८ वाजता मस्कटहून परतलेले पीआयएचे फ्लाइट 'पीके248' मुसळधार पावसामुळे लाहोरमधील अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरू शकले नाही. हवाई वाहतूक नियंत्रकांच्या सूचनांचे पालन करूनही, मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे पायलटचा विमान मार्ग चुकला. त्यामुळे २९२ किमी/तास वेगाने १३,५०० फूट उंचीवर उड्डाण करत, या वैमानिकाने हे विमान पंजाबमधील बधाना पोलीस ठाण्यापासून भारतीय हद्दीत प्रवेश केला.
भारतीय हवाई हद्दीत उड्डाण करताना वैमानिकाने विमान २० हजार फूट उंचीवर नेले. यामुळे पाकिस्तानकडून शंकास्पद हालचाली सुरू नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित झाला. पण खराब हवामान आणि मुसळधार पावसाने लाहोर विमानतळावर विमान उतरवण्यात वैमानिक अयशस्वी झाला. त्यानंतर हे विमान भटकल्याने भारतीय हद्दीत आल्याचे नंतर स्पष्ट झाले.