Latest

व्लादीमीर पुतीन यांना असाही दणका; थोरल्या डॉ. लेकीचा संसार उद्ध्वस्त, ‘ते’ स्वप्नही भंगले !

backup backup

मॉस्को; पुढारी ऑनलाईन : रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मोठी मुलगी डॉ. मारिया वोरोंत्सोवाला (Maria Vorontsova) फटका बसला आहे. युक्रेन युद्धाने पुतिन यांच्या मुलीचे रशियामध्ये अतिश्रीमंत परदेशी लोकांसाठी उच्चभ्रू वैद्यकीय केंद्र उघडण्याचे स्वप्न भंगले आहे.

मारिया वोरोंत्सोवा तिच्या डच व्यावसायिक पतीपासून विभक्त झाली आहे. त्यांचा संसार मोडला आहे. मारिया या लहान मुलांमधील दुर्मिळ जनुकीय आजारांच्या तज्ञ डॉक्टर आहे. दोघांनाही मुले आहेत. रशियाचे अध्यक्ष पुतिन हे केजीबीचे गुप्तहेर असताना डॉ. मारियाचा जन्म झाला.

दुसऱ्या लेकीने सोशल मीडिया सोडला

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि त्यांचे जवळचे लोक युक्रेनमध्ये युद्धाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर लोकांच्या निशाण्यावर आहेत. त्यांनाही युद्धाचा दोषी मानून लोक त्यांना शिव्यांची लाखोली वाहत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मायक्रोब्लॉगिंग साइट्सवर १८ वर्षीय लुइझा क्रिवोनोगिखसोबत (Luiza Krivonogikh) असेच काहीसे घडत होते. ट्रोल होऊ नये म्हणून अखेर तिने सोशल मीडियाचा निरोप घेतला.

निर्वासित रशियन शोध पत्रकार, सर्गेई कानेव्ह यांनी उघड केले आहे की पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या मुलीचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. रशियावर पाश्चात्य देशांनी व्यापक निर्बंध लादले आहेत. "सेंट पीटर्सबर्गजवळ एक सुपर मॉडर्न मेडिकल सेंटर बांधण्याच्या मेगा प्रोजेक्टमध्ये तिचा मोठा वाटा आहे.

सुपर मॉडर्न मेडिकल सेंटरचे स्वप्न भंगले

पुतीन यांच्या मुलीने युरोपातील रुग्ण आणि आखाती देशांतील श्रीमंत शेखांना उपचारासाठी रशियात आकर्षित करण्याची योजना आखली होती. अहवालात दावा केला जात आहे की, युक्रेनवरील हल्ल्यानंतर युरोप आणि शेख यांच्याकडे लोक कसे येतील ?

पुतीन यांच्या मोठ्या मुलीच्या पतीचे नाव जोरीट फासेन (Jorrit Faassen) आहे. पती-पत्नी कधी वेगळे झाले हे अहवालात सांगितले नसले तरी युद्ध सुरू झाल्यापासून ते वेगळे झाले असल्याचे समजते. त्यांच्या मुलांचे तपशील सार्वजनिक नाहीत. फासेनने रशियात दीर्घकाळ काम केल्याचे सांगितले जाते. त्याचे वडील डच सशस्त्र दलात कर्नल होते.

पुतिनच्या डच जावयाने एकदा सांगितले की त्याने एका रशियन महिलेशी लग्न केले आणि त्यांना मुले झाली. मारिया तिच्या आजीचे आडनाव वोरोंत्सोवा (Vorontsova) वापरते. त्या रशियन आरोग्य मंत्रालयाच्या नॅशनल मेडिकल रिसर्च सेंटर फॉर एंडोक्रिनोलॉजीचे प्रमुख संशोधक आहेत. गेल्या वर्षी, मारियाची एक मुलाखत एका चॅनेलवर प्रसारित झाली ज्यामध्ये ती मुलांमधील दुर्मिळ आजाराबद्दल बोलली. परंतु, पुतिन यांची मुलगी म्हणून तिची ओळख उघड केली नाही.

हे ही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT