अमेरिकेच्या मॅकडोनल्डसला रशियानं पर्याय शोधला, ‘अंकल वान्या’चा लोगो व्हायरल | पुढारी

अमेरिकेच्या मॅकडोनल्डसला रशियानं पर्याय शोधला, 'अंकल वान्या'चा लोगो व्हायरल

मॉस्को ; वृत्तसंस्था : युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. केवळ अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध घातले असून अनेक बड्या कंपन्यांनीही रशियातील आपली सेवा बंद केली आहे. यामध्ये अमेरिकन मॅकडोनल्डस या खाद्यनिर्मिती करणार्‍या कंपनीचाही समावेश आहे. मात्र यासाठी रशियानेही जोरदार तयार केली असून मॅकडोनल्डसला पर्याय शोधला आहे. अंकल वान्या हा पर्याय रशियाने शोधला आहे.

युक्रेनवर हल्ल्याचा निषेध म्हणून मॅकडोनल्डस या कंपनीने रशियातील 850 आऊटलेट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या डुमा प्रांताचे अध्यक्ष व्होलोडिन म्हणाले की, मॅकडोनल्डसला पर्याय म्हणून आता अंकल वान्या देशात सुरू केले जाणार आहे. अंकल वान्याचा लोगो तयार करण्यात आला असून हा लोगो आणि मॅकडोनल्डसचा लोगो यांच्यात खूपच साम्य आहे. प्रसिद्ध रशियन लेखक अँटोन चेखव्ह यांचे 1897 मध्ये प्रकाशित झालेल्या नाटकाचे नाव अंकल वान्या होते.

लोगो सोशल मीडियावर व्हायरल

अद्याप मॅकडोनल्डसने याबाबत काहीच टिप्पणी केलेली नाही. मात्र रशियाच्या अंकल वान्या हा लोगो सोशल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मॅकडोनल्डसचा लोगो रशियाने कॉपी केली असल्याच्या प्रतिक्रिया युजर्सकडून केल्या जात आहेत. युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियातील सुमारे 400 व्यवसाय बंद करण्यात आले आहेत.

Back to top button