Latest

Kohli dance on ‘Chaleya’ : विराट काेहली जेव्‍हा ‘चलेया’ वर थिरकतो…..

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जिंकण्‍यासाठीच मैदानात उतरतो, अशी असणारी देहबोली. मैदानावरील विलक्षण उर्जा आणि आपल्‍या नेत्रदीपक फटकेबाजीने चाहत्‍यांची मने जिंकणे, हे आजवर क्रिकेटमध्‍ये काही खेळाडूंनाच शक्‍य झाले आहे. यामध्‍ये टीम इंडियाचा मुख्‍य चेहरा असणार्‍या विराट कोहलीचे नाव अग्रस्‍थानी आहे. विराटने रविवारी दक्षिण आफ्रिके विरुद्धच्‍या सामन्‍यात ४९ वे शतक झळकावत वाढदिवसाचे रिनर्ट गिफ्‍टच आपल्‍या चाहत्‍यांना दिले. यानंतर  क्षेत्ररक्षणावेळी 'चलेया' गाण्‍यावर थिरकत त्याने मैदानावरील चाहत्‍यांची मने जिंकली. विराटचा मैदानातील डान्‍सचा 'आयसीसी'ने शेअर केलेला व्‍हिडिओ सध्‍या सोशल मीडियावर तुफान व्‍हायरल होत आहे. ( Kohli dance on 'Chaleya' ')

रविवार, ५ नोव्हेंबर रोजी विराट कोहलीने आपला ३५ वा वाढदिवस शानदार पद्धतीने साजरा केला. त्याने आपल्‍या कारकीर्दीतील ४९ वे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) शतक झळकावले. या कामगिरीमुळे त्‍याने क्रिकेट माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याच्‍या सर्वाधिक  वन-डे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

 Kohli dance on 'Chaleya' : विराटने जिंकली चाहत्‍यांची मने…

रविवारच्‍या सामन्‍यात उत्‍कृष्‍ट फलंदाजीचे प्रदर्शन घडवत विराट काेहलीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरल्‍यानंतर सुपरस्टार शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातील लोकप्रिय गाणे 'चलेया'च्या तालावर तो आनंदाने नाचताना दिसला. त्‍याच्‍या या एका स्‍टेपमुळे मैदानात चाहत्‍यांच्‍या उत्‍साहाला उधाण आले. विराट एवढ्यावरच थांबला नाही. त्‍यानंतर 'बँड बाजा बारात' या चित्रपटातील 'ऐनवयी ऐनवाई' या गाण्‍यावर थिरकताना तो दिसला. या चित्रपटाने विराटची पत्‍नी अनुष्का शर्माने अभिनयात पदार्पण केले होते. त्‍यामुळे या चित्रपटाचे विराटच्‍या जीवनात खास स्‍थान आहे.

विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या ३२६ धावा करण्यात कोहलीच्‍या विक्रमी शतकाचा माेठा वाटा राहिला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 83 धावाच करू शकला. या सामन्‍यात भारताने 243 धावांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT