पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Record : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा तळपली. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध शानदार 88 धावांची खेळी केली. पण अवघ्या 12 धावांनी शतक हुकल्याने सर्व मुंबईच्या वानखेडे मैदानावर उपस्थित चाहते सुन्न झाल्याचे पहायला मिळाले. मात्र, या खेळीदरम्यान विराटने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 8 व्यांदा एक हजाराहून अधिक वनडे धावांचा टप्पा पार केला. याचबरोबर त्याने भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. सचिनने सातवेळा वनडेमध्ये एका कॅलेंडर वर्षात एक हजाराहून अधिक धावा केल्या आहेत.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध 34 धावा केल्यानंतर विराटने या वर्षी वनडेमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो एकूण चौथा आणि तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटने 23 एकदिवसीय सामन्यांच्या 20 डावांमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला. (Virat Kohli Record)
8 : विराट कोहली
7 : सचिन तेंडुलकर
6 : कुमारा संगकारा
6 : रिकी पाँटिंग
6 : सौरव गांगुली
5 : रोहित शर्मा
4 : तिलकरत्ने दिलशान
4 : सनथ जयसूर्या
2011 : 1381 धावा
2012 : 1026 धावा
2013 : 1268 धावा
2014 : 1054 धावा
2017 : 1460 धावा
2018 : 1202 धावा
2019 : 1377 धावा
2023 : 1054 धावा*