Latest

Vinesh Phogat : आशियाई स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का; कुस्तीपटू विनेश फोगट स्पर्धेबाहेर

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशियाई स्पर्धेमधून बाहेर पडली. फोगटने मंगळवारी (दि.१४) ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. दि.१७ ऑगस्टला तिच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. "काही दिवसांपूर्वी प्रशिक्षणादरम्यान माझ्या गुडघ्याला दुखापत झाली होती. स्कॅनिंगनंतर डॉक्टरांनी माझ्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. माझ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया होणार आहे," असे तिने सांगितले. (Vinesh Phogat)

विनेशने आपल्या ट्विटमध्ये म्‍हटलं आहे की, "माझी (दि.१७) ऑगस्टला मुंबईत शस्त्रक्रिया होणार आहे. दुखापतीमुळे मी आशियाई स्पर्धेतुन माघार घेतली आहे. राखीव खेळाडूला आशियाई क्रीडा स्पर्धेत पाठवावे यासाठी मी अधिकाऱ्यांना तात्काळ कळवले आहे. मी सर्व चाहत्यांना विनंती करू इच्छिते की, त्यांनी मला पाठिंबा देत राहावे जेणेकरून मी लवकरच मॅटवर जोरदार पुनरागमन करू शकेन आणि पॅरिस २०२४ ऑलिम्पिकसाठी तयारी करू शकेन. तुमच्या पाठिंब्याने मला खूप बळ मिळते विनेश आणि बजरंग पुनिया यांना आशियाई खेळांच्या चाचण्यांमधून सूट देण्यात आली होती. यामुळे त्यांच्यावर कुस्ती समुदायांनी टीका केली होती. (Vinesh Phogat)

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT