Latest

UP crime : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणाचे हात-पाय तोडले, अंध केले आणि भीक मागणाऱ्या टोळीला विकले

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क: गावात मुले पळवणारी टोळी आली आहे. मुलं पळवून भीक मागायला लावतात. आज इथे मूल पळवलं अशा कथित घटना तुम्ही नेहमी ऐकत असता. अशीच एक धक्कादायक घटना आणि एका चित्रपटाला साजेशी अशी घडली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या एका तरुणाचे हात-पाय तोडले, डोळे फोडले आणि भीक मागणाऱ्या टोळीला विकले. ही धक्कादायक घटना घडली आहे उत्तरप्रदेश राज्यात (UP crime). वाचा सविस्तर बातमी

 डोळ्यात केमिकल टाकून अंध केलं

माहिती अशी की, नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणाचे हात-पाय तोडले, अंध केले आणि भीक मागणाऱ्या टोळीला विकले. ही धक्कादायक घटना घडली आहे उत्तरप्रदेश राज्यातील कानपूर शहरात. कानपूरमधील नौबस्ता परिसरातील ३० वर्षीय एक तरुण नोकरीच्या शोधात होता. त्याचं नाव सुरेश मांझी. तो गेले सहा महिने नोकरी शोधत होता. नोकरी शोधता-शोधता विजय मिले व्यक्तीशी त्याची ओळख झाली. विजय हा मछरिया पिंक बिल्डींग मध्ये राहत होता. विजयने नोकरी दिली नाही पण नोकरी देण्याचं आमिष दाखवलं आणि त्याला शहरातील झकरकटी पुलाखाली बंदिस्थ केले.  त्यानंतर त्याला मारपीट केली. हाताचे पंजे आणि एक पाय तोडला. विजय एवढ्यावरचं थांबला नाही तर त्याने सुरेशच्या डोळ्यात केमिकल टाकून अंध बनवलं. सुरेशच्या शरीरावर काही ठिकाणी बंदुकीच्या गोळ्यांचे व्रणही निदर्शनास आले आहेत.

पोलिस सुरेशची चौकशी करताना.

UP crime : काही हजारात विकलं 

विजयने सुरेशला मारपीट केलं, शरीराला इजा केली, अंध केलं. त्यानंतर त्याला ७० हजारांमध्ये दिल्लीतील एका टोळीला विकलं. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार ही टोळी भीक मागणाऱ्यांची होती. त्याचा प्रमुख हा राज नावाची व्यक्ती होती. टोळीमध्ये सुरेशला खूप त्रास देण्यात आला. त्याला एवढा त्रास देण्यात आला की, त्याची तब्येत बिघडली. दोन महिन्यापूर्वी त्याला राजने कानपूरला पाठवलं. तिथे विजयने त्याला जबरदस्ती भीख मागायला पाठवले. या दिवसात त्याला वेळेवर ना जेवण मिळत होते ना पाणी.

UP crime :प्रवासी ठरला तारक 

गेल्या रविवारी (दि.३१) त्याला शहरातील किदवई नगर भागातील एक प्रवासी भेटला. या प्रवाशाच्या मदतीने सुरेश आपल्या घरी गेला. घरी पोहचताचं त्याची अवस्था पाहून भाऊ रमेश आणि प्रवेश यांना आश्चर्याचा धक्का बसला. गुरुवारी (दि.३) सुरेश राहत असलेल्या परिसरातील नगरसेवकाला ही घटना समजली. त्यानंतर नगरसेवकाने सुरेशच्या कुटूंबियांच्या मदतीने नौबस्ता पोलिस स्थानकला तक्रार नोंदवली. याप्रकरणी कानपूर दक्षिण डीसीपी प्रमोद कुमार यांनी सांगितले की एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक स्थापन करण्यात आलं आहे. पोलिस तपास करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT