व्यभिचारी घटस्फोटित बायकोला कायमस्वरुपी पोटगी नाही – पंजाब, हरियाणा उच्च न्यायालय

व्यभिचारी घटस्फोटित बायकोला कायमस्वरुपी पोटगी नाही – पंजाब, हरियाणा उच्च न्यायालय

पुढारी ऑनलाईन – व्यभिचाराच्या मुद्यावर नवऱ्याने घटस्फोट दिला असेल तर बायकोला कायमस्वरूपी पोटगीचा हक्क नाही, असा निकाल पंजाब, हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती रितू बहरी आणि निधी गुप्ता यांनी हा निकाल दिला आहे. (No permanent alimony for adulterous wife)

या प्रकरणात अंबाला येथील कौटुंबिक न्यायालयाने २००८ला घटस्फोट दिला होता. या निकालाला आव्हान देणारी याचिका बायकोने उच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. द प्रिंट या वेबसाईटने ही बातमी दिली आहे.

CrPC 125 अंतर्गत बायको, मुले आणि पालक यांना पोटगी मिळते. पण उपकलमानुसार जर महिला व्यभिचारी असेल, सबळ कारणांशिवाय नवऱ्यापासून दूर राहात असेल किंवा परस्पर सहमतीने विलग झाले असतील तर पोटगी दिली जात नाही.
या प्रकरणात अंबाला कौटुंबिक न्यायालयाने सप्टेंबर २००८मध्ये नवऱ्याच्या याचिकेवर निकाल देताना घटस्फोटाला मान्यता दिली होती. हिंदू विवाह कायदा १९५५ मधील कलम १३ (१) (i) आणि १३ (१)(i-b) नुसार हा निकाल दिला गेला. १३ (१) (i) नुसार नवरा किंवा बायको यांचे विवाहबाह्य संबंध असतील तर घटस्फोट दिला जातो. तर कलम १३ (१)(i-b) नुसार नवरा किंवा बायकोने जोडीदाराला २ वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी सोडून दिले असेल तर घटस्फोट दिला जातो.

या जोडप्याचे लग्न मे १९८९ला झाले होते. नवऱ्याने बायकोचे वागणे क्रुर असून तिचे शेजाऱ्याशी विवाहबाह्य संबंध आहेत, असा आरोप केला होता. तर बायकोने हे आरोप फेटाळले होते. कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात नवऱ्याच्या बाजूने निकाल दिला होता.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news