लंडन : 'ले चॉकलेट बॉक्स' हे चॉकलेट जगातील सर्वात महागडे चॉकलेट (expensive chocolate) आहे, असे मानले जाते. या चॉकलेटची विशेष गोष्ट म्हणजे चॉकलेट बॉक्स. या बॉक्सला हिरे व अन्य मौल्यवान रत्ने जडवलेली असतात. त्यामुळे हे चॉकलेट खूपच खास आहे. सॉफ्ट आणि स्पेशल चवीसाठी प्रसिद्ध असलेले चॉकलेट कोणीही सहजासहजी घेऊ शकत नाही. 'ले चॉकलेट बॉक्स'च्या एका बॉक्सची किंमत सुमारे 1.5 दशलक्ष डॉलर म्हणजेच 10.94 कोटी रुपये आहे.
डेन्मार्कमधून आलेले निप्सचिल्ड चॉकोलेटियरचे चॉकलेट ट्रफल हे चॉकलेट देखील सर्वाधिक किमतीच्या (expensive chocolate) यादीत येते. चॉकलेट ट्रफलची किंमत 2,600 डॉलर म्हणजे 1,89,498 रुपये इतकी आहे. महागडे चॉकलेट बनवण्यासाठी 28 दुर्लभ प्रकारच्या गोष्टींचा वापर करण्यात येतो. दरम्यान, कोको, गोल्ड लीफ आणि ला मॅडेलिना वू ट्रफल या घटकांचा समावेश या चॉकलेटमध्ये करण्यात येतो. नोका चॉकलेट हे चॉकलेट देखील काही दिवसांपासून चर्चत आले आहे. या चॉकलेटची किंमत 330 डॉलर म्हणजे तब्बल 24602 रुपये होती.
हेही वाचा :