पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात प्रथमच ५.८ दशलक्ष टन लिथियमचे साठे सापडले आहेत. हे साठे जम्मू-काश्मीरमध्ये सापडले आहेत. याबाबत केंद्र सरकारने गुरुवारी (दि.१०), 'लिथियम हा एक नॉन-फेरस धातू आहे आणि तो EV बॅटरीजमधील प्रमुख घटकांपैकी एक आहे, असे सांगितले. वाचा सविस्तर बातमी.(Lithium )
जम्मू-काश्मीरमध्ये सापडलेल्या लिथियमबाबत खाण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की,"भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाने प्रथमच तब्बल-५.९ दशलक्ष टन लिथियम सापडले आहेत. हे साठे जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सलाल-हैमाना भागात सापडले आहेत. हे साठे लिथियम आणि सोन्यासह ५१ खनिज ब्लॉक आहेत. ते संबधित राज्य सरकारला सुपूर्द करण्यात आले आहेत. या ५१ खनिज ब्लॉक्सपैकी ५ ब्लॉक्स सोन्याशी संबंधित आहेत आणि इतर ब्लॉक्स हे पोटॅश, मॉलिब्डेनम, बेस मेटल आदी खनिजांचे आहेत.
हेही वाचा