Latest

The Kashmir Files: ट्रोल झालेल्या कपिलवरील आरोपांवर अनुपम खेर यांचं स्पष्टीकरण, सत्य आहे तरी काय?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

प्रसिध्द कॉमेडियन कपिल शर्मा हा द कश्मीर फाईल्स या चित्रपटामुळे चर्चेत आला होता. त्याने आपल्या कॉमेडी शोमध्ये या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिल्याने तो चांगलाचं ट्रोल झाला. सोशल मीडियावर त्याला खडेबोल सुनावण्यात आले. 'द कश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने म्हटले होते की, कॉमेडियन कपिल शर्माने त्यांनी त्याच्या शोमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बोलावलं नाही, कारण या चित्रपटात मोठा अभिनेता कुणी नाही. त्यामुळे ट्विटरवर हॅशटॅग 'बॉयकॉट कपिल शर्मा शो' चा ट्रेंड होता. आता अभिनेता अनुपम खेरने कपिलचे समर्थन केले आहे.

कपिलने यावर स्पष्टीकरण देत म्हटलंय की, विवेकचे आरोप खोटे आहेत. सोशल मीडियावर जे काही सांगितलं जात आहे. लोक त्यावर विश्वास करत आहेत. तसेच कपिल म्हणाला की, त्यांना शोमध्ये बोलावण्यात आलं होतं. पण, विषयाचे गांभीर्य पाहून त्यांची विनंती फेटाळण्यात आली. त्याचवेळी अनुपम खेर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले की, "मला शोसाठी कॉल आला होता, पण मी माझ्या मॅनेजरला सांगितले की हा चित्रपट खूप गंभीर आहे. मी त्यात जाऊ शकत नाही. हा विषय २ महिन्यांपूर्वीचा आहे.

अनुपम म्हणाले की, त्यांना सांगण्यात आले की तुम्ही या शोमध्ये यावे. मला वाटले की मी या शोमध्ये यापूर्वी गेलो आहे आणि हा एक मजेदार शो आहे. फनी शो करणे खूप अवघड आहे.

अनुपम यांच्या स्पष्टीकरणानंतर कपिलने आपल्यावर लावलेले सर्व खोटे आरोप फेटाळले. त्यांनी अनुपम यांचे आभार मानले. कपिल शर्माने त्यांच्या एका इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'धन्यवाद paaji @anupampkher'.

शोच्या निर्मात्यांनी अनुपम खेर यांचे आभार मानले आहेत. 'द कश्मीर फाईल्स' ११ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होत. हा चित्रपट हिट ठरत आहे. याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटाने जबरदस्त कमाई देखील केली आहे. द काश्मीर फाइल्समध्ये खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

SCROLL FOR NEXT