Neena Gupta : ‘महिलांनी बोल्ड कपडे घालणे यामध्ये काहीच चुकीचे नाही’ | पुढारी

Neena Gupta : 'महिलांनी बोल्ड कपडे घालणे यामध्ये काहीच चुकीचे नाही'

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘बधाई हो’, शुभ मंगल ज्यादा सावधान, आणि पंगा यांसारख्या सिनेमांमधील प्रसिद्ध अभिनेञी नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी सोशल मिडियावर एका व्हिडिओ मधून ट्रोलर्संना चांगलेच धारेवर धरले. बोल्ड कपडे परिधान करून त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये स्ञियांच्या कपड्याविरोधी असणाऱ्या ट्रोलर्संना त्यांनी चांगलेच सुनावले.

ही व्हिडिओ नीना यांनी बोल्ड कपडे परिधान करूनच शेअर केलेली पहायला मिळते. निना गुप्ता यांनी या व्हिडिओमधून स्पष्ट शब्दात सांगितले की, “मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते की महिलांनी बोल्ड कपडे घालणे यामध्ये काहीच चुकीचे काही नाहीये. मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी संस्कृतमध्ये एमफील (Mphil) केले आहे. आणखी बरेच शिक्षण माझे झालेले आहे. खूप चांगल्याप्रकारची कामे देखील केली आहेत.”

त्याचबरोबर त्यांनी असंही मत व्यक्त केलं की, आपण कधी कोणाला कपड्यांवरून त्यांची पारख करणे चुकीचे आहे. ट्रोल करणाऱ्यांनी असे करणे बंद करणे योग्य राहील.

या व्हिडिओ वरून सोशल मिडियामध्ये सकारात्मक प्रतिक्रिया पहायला मिळाली. कियारा अडवाणी, सुनील ग्रोवर, अर्चना पूरन सिंह, ताहिरा कश्यप, अशा अनेक व्यक्तींनी या पोस्टला चांगला प्रतिसाद दिला. गेल्या वर्षी नीना गुप्ता यांना पांढऱा शर्ट आणि निळ्या शॅार्ट्स वरून चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर त्या बरेच दिवस चर्चेत राहिल्या होत्या.

हेही वाचा

Back to top button