दिवसभरात केवळ २ हजार ५६८ कोरोनाग्रस्तांची भर | पुढारी

दिवसभरात केवळ २ हजार ५६८ कोरोनाग्रस्तांची भर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांमध्ये कमालीची घट नोंदवण्यात येत आहे. सोमवारी दिवसभरात केवळ २ हजार ५६८ कोरोनाबाधितांची (corona) भर पडली. तर, ९७ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, ४ हजार ७२२ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. देशात केवळ ३३ हजार ९१७ सक्रिय कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. तर, ४ कोटी २४ लाख ४६ हजार १७१ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख १५ हजार ९७४ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य वाढ नोंदवण्यात आली आहे. रविवारी २ हजार ५०३ कोरोनाबाधित आढळले होते. तर, २७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८० कोटी ४० लाख २८ हजार ८९१ कोरोना डोस लावण्यात आले आहेत. यातील १९ लाख ६४ हजार ४२३ डोस सोमवारी दिवसभरात लावण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून देशात आतापर्यंत २.१३ कोटी बूस्टर डोस लावण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १८२ कोटी ८४ लाख ९४ हजार २३० डोस पैकी १७ कोटी ३० लाख ६१ हजार ६८१ डोस अद्यापही केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांकडे शिल्लक आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत ७७.९७ कोटी कोरोना तपासण्या करण्यात आल्या असून यातील ७ लाख १ हजार ७७३ तपासण्या सोमवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

राजधानीत १३६ नवीन रुग्णांची भर

राजधानी दिल्लीत सोमवारी दिवसभरात १३६ रुग्णांची नोंद झाली असून एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण ०.५६ टक्के नोंदवण्यात आहे. दिल्लीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८ लाख ६३ हजार ७० पर्यंत पोहचली असून आतापर्यंत राज्यातील २६ हजार १४१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. राज्यात केवळ ६९३ सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : पहिली मालिका ते पहिला क्रश | Rapid Fire with aayush sanjeev

Back to top button