Latest

Taliban Made First Supercar : तालिबानने बनवली पहिली सुपरकार!

Arun Patil

काबुल : तालिबान (Taliban Made First Supercar) आणि नवे तंत्रज्ञान यांचा दुरान्वयेही काही संबंध असेल असे अर्थातच आपल्याला वाटणार नाही. मात्र आता तालिबानने अफगाणिस्तानातील पहिली सुपरकार बनवून आश्चर्याचा धक्का दिला आहे. तालिबानने या सुपरकारला 'माडा-9' असे नाव दिले असून या सुपरकारच्या प्रोटोटाईपचे अलीकडेच तालिबानकडून अनावरण करण्यात आले आहे. या कारची जगभरात चर्चा रंगली असून अनेक पाश्चात्त्य माध्यमांनी या सुपरकारच्या वृत्ताला महत्वाचे स्थान दिले आहे.

या सुपरकारमध्ये (Taliban Made First Supercar) टोयोटा कोरोलाचे इंजिन बसवले आहे. अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, इंजिनमध्ये अशा प्रकारे बदल करण्यात आले आहेत की ते अधिक वेगाने चालवता येईल. 'एन्टॉप' या कार विकसित करणार्‍या कंपनीने भविष्यात कारमध्ये इलेक्ट्रिक पॉवरट्रेन बसवण्याची योजना आखली आहे. ही कार टायरसह संपूर्ण काळ्या रंगाची आहे. स्पोर्टी लूकसाठी ब्रेक कॅलिपर लाल रंगात ठेवण्यात आला आहे. संपूर्ण डिझाइन स्पोर्टस् कारसारखे आहे. कारचे टेल लॅम्प दिसायला अतिशय आकर्षक आहेत, हेडलॅम्पसाठी एलईडी दिवे आहेत.

कंपनीने कारचे पॉवर आऊटपुट उघड केलेले नाही. ही सुपरकार अजूनही प्रोटोटाईप टप्प्यात आहे. अफगाणिस्तानातील 30 अभियंत्यांच्या टीमने ही कार बनवली असून ती बनवण्यासाठी पूर्ण 5 वर्षे लागली आहेत. त्यासाठी सुमारे 50 हजार अमेरिकन डॉलर्स (40 लाख रुपये) खर्च झाले आहेत. तालिबानचे उच्च शिक्षण मंत्री अब्दुल बाकी हक्कानी यांनी या सुपरकारचे अनावरण केले. 'एन्टॉप' नावाच्या कंपनीने हे प्रोटोटाईप मॉडेल विकसित केले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT