संगमनेर : रस्त्यांसाठी 21 कोटी 75 लाख निधी; आ. थोरातांचे प्रयत्न; इंद्रजीत थोरात यांनी दिली माहिती

संगमनेर : रस्त्यांसाठी 21 कोटी 75 लाख निधी; आ. थोरातांचे प्रयत्न; इंद्रजीत थोरात यांनी दिली माहिती

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विकास कामांची घोडदौड सुरू आहे. आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तालुक्यातील रस्त्यांसाठी 21 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे. रस्त्यांच्या निधीबाबत माहिती देताना इंद्रजीत थोरात म्हणाले की, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे कालव्यांच्या कामाला अत्यंत गती दिली होती. या कालव्यासाठी मोठा निधी मिळून रात्रंदिवस कामे सुरू ठेवले होते.

मात्र नवीन सरकार आले आणि अनेक कामांना स्थगिती दिली. मात्र आमदार थोरात यांनी विविध गावांमधील सुचवलेले रस्ते व विकास कामांसाठी निधी आता मंजूर झाला आहे. मागील आठवड्यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत विविध रस्त्यांसाठी 32 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मिळवला. तर आता नव्याने तालुक्यातील विविध रस्त्यांकरता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 21 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या अंतर्गत रणखांबवाडी फाटा- रणखांबवाडी ते कुंभारवाडी वरवंडी या 15 किलोमीटर रस्त्यासाठी 11 कोटी 25 लाख, राजापूर ते राष्ट्रीय महामार्ग 50 चिखली 5 किलोमीटर रस्त्यासाठी 3 कोटी 75 लाख रुपये तसेच आणखीही रस्त्यांची कामे होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news