Latest

Swiss Open : पी व्‍ही सिंधु, पोनप्‍पा-रेड्‍डी यांची दुसर्‍या फेरीत धडक

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : स्‍विस ओपन (Swiss Open) बॅडमिंटन स्‍पर्धेत महिला एकेरी भारताची स्‍टार बॅडमिंटनपटू पी. व्‍ही. सिंधु, तर दुहेरीत पोनप्‍पा-रेड्‍डी यांच्‍या जोडीने दुसर्‍या फेरीत धडक मारली. तर पुरुष दुहेरीत एमआर अर्जून आणि ध्रुव कपिला हे पहिल्‍याच फेरीत पराभूत झाले आहेत.

Swiss Open : आता सिंधुसमोर चीनच्‍या यिगितचे आव्‍हान

दोनवेळा ऑलिम्‍पिक पदक पटकविणार्‍या सिंधुचा पहिला सामना डेमाकंच्‍या लाईन होजमार्क जेर्सफेल्‍ड हिच्‍याबरोबर होता. सिंधुने जेर्सफेल्‍डला सलग २१-१४, २१-१२ अशा दोन सेटमध्‍ये पराभूत केले. आता दुसर्‍या फेरीत तिचा सामना चीनच्‍या नेस्‍लिहान यिगित हिच्‍याबरोबर होणार आहे.

पोनप्‍पा-रेड्‍डी यांचा सहज विजय

मिश्र दुहेरीमध्‍ये अश्‍विनी पोनप्‍पा आणि एन सिक्‍की रेड्‍डी यांच्‍या जोडीने स्‍थानिक स्‍विर्झलंडची अलियना मुल्‍लेर आणि जॅनजिरा स्‍टँडमॅन यांचा सलग दोन सेटमध्‍ये पराभव केला. जागतिक क्रमवारीमध्‍ये सहाव्‍या क्रमाकांवर असणार्‍या पोनप्‍पा-रेड्‍डी जोडीने २१-१५. २१-१६ असा सलग दोन सेटमध्‍ये सहज विजय मिळवला.

पुरुष दुहेरीत एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला पराभूत

पुरुष दुहेरीत भारताचा एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांच्‍या इंडोनेशियाच्‍या फजर अल्‍फियान आणि मोहम्‍मद रियान अर्डियन्‍टो यांचा मुकाबला झाला. पहिल्‍या सेटमध्‍ये अर्जुन आणि ध्रुव यांनी आघाडी घेतली. ते सामन्‍यावर पकड निर्माण करतील, असे वाटत असताना अल्‍फियान आणि अर्डियन्‍टो यांनी जोरदार मुसंडी मारली. १९-२१, १३-२१ असे सलग दोन सेट जिंकत सामना आपल्‍या नावावर केला.

ऑल इंग्‍लंड ओपन बॅडमिंटन चॅम्‍पियनमधील उपविजेता लक्ष्‍य सेन स्‍विस ओपनमध्‍ये सहभागी झालेला नाही. त्‍यामुळे आता किदांबी श्रीकांत, बी साई प्रणीत, पीव्‍ही सिंधु, सायना नेहवाल, सात्‍विक साईराज, रैंकीरेड्‍डी-चिराग शेट्‍टी यांच्‍याकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT