Latest

Ankita Konwar : डोक्यात काहूर माजलंय… ‘अंकिता’ डिप्रेशनमध्ये!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

सुपर मॉडल आणि अभिनेता मिलिंद सोमनची पत्नी 'अंकिता' कोंवर डिप्रेशनमध्ये आहे. याचा खुलासा तिने स्वत: आपल्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर केला आहे. एक फोटो पोस्ट करून 'अंकिता' ने हे सांगण्याचा प्रयत्न केला की, ती फोटोमध्‍ये हसताना दिसत असली तरी ती वास्तवात ठिक नाहीये.

तिने एक फोटो पोस्ट केलाय. त्याचबरोबर, तिनं लिहिलंय-"हा सध्याचाच फोटो आहे. एक दिवस माझ्या डोक्यात काहूर माजल होत; पण चेहऱ्यावर हास्यासोबत शांती होती. हो, माझ्याकडे अजून काही दिवस आहेत. सर्व काही 'ठीक' नाहीये. प्रत्येकजण जो ठीक दिसतो. वास्तवात सर्व काही ठीक नाही."

कोंवर लिहिते, काही गोष्टी एकाच वेळी खूप जड आणि अर्थहीन वाटू लागतात; पण मी पहिल्यासारखं घाबरत नाही. काळजी आणि डिप्रेशनचा दीर्घकाळ जगल्यानंतर आता मला काळ्या डागांचा सामना करावा लागतोय.  जेव्हा मला अंधाराचा सामना करावा लागतो तेव्‍हा मी रडते. मी माझ्या विचारांना त्याप्रकारे ठेवत नाही, जसे मी करत होते.

ती पुढे म्हणते, पण, आता मी स्ट्राँग झाली आहे आणि अधिक सकारात्मक झालीय. मी अंधाराच्या पॅचच्या माध्यमातून प्रकाश पाहण्याचा प्रयत्न करतेय. आपल्यापैकी काहींना या जगात जिवंत राहण्यासाठी अन्य लोकांच्या तुलनेत थोडे अधिक प्रयत्न करावा लागतो. हे कोणासाठी तितकं सोपं नाही. तुम्ही फक्त चांगले आणि स्ट्राँग होत जाता.

कोंवर आणि मिलिंद सोमनच्या लग्नाला ३ वर्षांहून अधिक काळ गेला आहे. दोघांचं नातं ७ वर्ष जुनं आहे. इतक्या वर्षांनंतरही त्यांच्यात प्रेम दिसतंय. दोघे नेहमी रोमँटिक पोस्ट शेअर करायला विसरत नाहीत. फम, हे कपल वयातील अंतरवरून नेहमी ट्रोल होत राहतात.

हेही वाचलं का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT